नाते हे फुलपाखरं सारखे कोमल असतात पकडून ठेवले तर बंधिस्त झालेले दिसतात आणि सोडून दिले तर दूर गेल्या सारखे दिसतात. त्यामुळे नात्याना नाजूक आणि कोमल विश्वासाने जपले तर ते चिरकाल टिकणार नाही तर फुलपाखरासारखे क्षणभंगुर आनंद देऊन दूर निघून जाणार! नात्यांबद्दल बोलायला गेले तर काही मार्मिक उदाहरणे माणसाला विचार करावयास भाग पडतात आणि त्यांचा प्रभाव आपल्या दैनंदिन जीवनात नेहमीच पडतो.
"चूक ही आयुष्याचं एक पान आहे.
पण 'नाती ' म्हणजे आयुष्याचं ' पुस्तक' आहे.
गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका.
पण...एका पानासाठी अख्खं 'पुस्तक' गमावू नका."
जीवनामध्ये नात्यांना खूप महत्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. सुख-दुःखात, आनंदांत आणि जीवनात प्रत्येक वळणावर नाते महत्वाची भूमिका बजावत असतात. मानव जन्माला येतो तो एकटाच येतो व जाताना एकटाच जातो. पण मधल्या आयुष्याच्या वाटचालीत तो असंख्य नात्यांच्या जंजाळात अडकतो. इतका अडकतो की त्यात त्याची घुसमट हाते, तो गुदमरतो. काही काही नात्यातून त्याची सुटकाच नसते. कमळाच्या जाळ्याप्रमाणे हे जाळे असते. एकदा पाय अडकला की त्यातून सुटणे महाकठीण! काही फार थोडे महाभाग असे असतात की ज्यात ते फारसे अडकत नाही आणि जरी अडकले तरी मोठय़ा शिताफीने त्यातून आपली सुटका करून घेतात.
ही सर्व नाती आपल्यातील गुणसुत्रांमुळे जोडली जातात. प्रत्येकाला एक नाव असतं आणि त्याला साजेश्या काही आपेक्षसुद्धा असतात. एखाद्या आखीव चौकटीमध्ये ज्याप्रमाणे चार गोष्ठी जुळून याव्या लागतात तसाच नात्याची चौकाट पूर्ण करायला आवश्यक असतात अपेक्षा, प्रेम, जवाबदारी आणि कर्तव्य. नातं कधीच एका बाजूनी नसतं, ते दोनही बाजूनी एकमेकास धरून असतात. जस आई-बाबा आणि मुलं, मामा आणि भाचा, काका आणि पुतण्या हे कसे एकाच वेळेला एकमेकांशी जोडलेली असतात. खरंतर जेव्हा ही नात्याची घडी बसत असते त्याचं वेळी ती प्रेम, अपेक्षा, जवाबदारी आणि कर्तव्य यांना जोडणारी एक अस्पष्ट चौकटही आखली जाते. बरं इतपर्यंत सर्व ठीक असते.
नात्यांचा विषय निघालाच आहे तर विमल लिमये यांनी लिहिलेली कविता आठवली
घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती...
तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती...
सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी...
अश्रुतूनही प्रीत झरावी नकोच नुसते पाणी...
या घरट्यातून पिलू उडावे दिव्या घेउनी शक्ती....
आकांशाचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती.....
तुम्ही थोडा विचार केला तर तुमच्या लक्षात येइल नात्यात कटुता येण्यामध्ये कोणाचाही दोष नसतो.. ना तुमचा ना समोरच्याचा.नात्यांमध्ये येणाऱ्या या कडवटपण्याला जवाबदार कोण हा विचार करत बसलो तर आपण त्यात गुंतून जातो. आणि हे नात कधी कधी इतक गुंतू लागतं की आपल्याला त्या नात्याचाच विसर पडून जातो किंवा ते कायमच तुटू ही शकतं.नातं ही आपल्याला मिळालेली परमेश्वरी देणगी आहे.
माणसाला सर्व अवयावांसोबत ‘मन’ नावाचा एक अवयव देखील असतो. मन म्हणजे काय हे कोणीच सांगू शकत नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाचं मन वेगवेगळ असतं. काही वेळा आपलं मन कलाटणी खात आणि त्याला मैत्रीचा चौकटीत काही बदल करावेसे वाटतात. अचानक बदलेल्या चौकटीत adjust होण्यासाठी वेळेची गरज लागतेच. कारण अशा वेळी मैत्रीमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते. पण हा दुरावा जास्त काळ टिकून मात्र राहत नाही . कारण बदल जरी एकानेच केले असले तरीही त्यात compromise करायची तयारीही आपली असते. So keep it up.
नात्यांना पाखरांप्रमाणे, मनाप्रमाणे, कुवतीप्रमाणे स्वच्छंद उडू द्या ना! नात्यांचे अडसर कशाला हवेत त्यांच्या मार्गात? त्यांना धडपडू द्या, थोडे खरचटू द्या, जरासे हळहळतील- पण नंतर आत्मविश्वासाने सावरतील! नव्या जोमाने धावतील! ही स्वनिर्णयाची आनंदी- दिवाळी साजरी करू द्या ना त्यांना. मळकट, मंद प्रकाशाच्या दिव्यात त्यांना योग्य वाट कधीच दिसणार नाही. तेव्हा नात्याच्या बंधनातून त्यांना मुक्त करू या. नाते म्हणजे आहे तरी काय ? दोन जीवांमधील बंध. सोनेरी कोवळ्या उन्हात दवबिंदूंनी चमकणाऱ्या कोळ्याच्या प्रचंड जाळ्यासारखे. बंधनात बांधणारे पण तरीही हवेहवेसे वाटणारे! या नात्यांचे पदर तरी किती? रक्ताचे कौटुंबिक नाते, प्रियकर-प्रेयसीचे नाते, मैत्रीचे, गुरु-शिष्याचे नाते, शेजाऱ्यांशी नाते, एका गावातले, संकटांनी आणि दुःखानी एकत्र आलेल्यांचे नाते आणि तसेच आनंदात सहभागी होणाऱ्यांचे नाते.
जीवनात नाती तशी
अनेकच असतात,
पण ती जपणारी लोक
फार कमीच असतात......|काही नाती असतात,
न जोडता सुद्धा टिकणारी,
तर काही जोडून सुद्धा तुटणारी.........
पण स्वतःला ‘समाजशील’ आणि ‘बुद्धीमान’ म्हणवून घेणारे आपण नाती जपण्यात इतके अपयशी का ठरतो? कारण आपल्या व्यक्तित्वाचे अनेक काटे इतरांना बोचत असतात, समोरच्याला प्रभावित करण्यापेक्षा त्याच्यावर प्रभुत्व गाजवणे आपल्याला जास्त महत्वाचे वाटते, समोरच्याचे ऐकून घेण्यापेक्षा आपली मते त्याच्यावर लादायला आपल्याला जास्त आवडते, शिवाय समोरचा ‘आहे तसा’ त्याला स्विकारणे आपल्याला कधीच जमत नाही! खरे म्हणजे , नाती ही बंधने नसून आपल्या जगण्याचे बळ आणि आधारस्तंभ आहेत. “हे विश्वची माझे घर” म्हणणाऱ्या ज्ञानोबांचा वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी आपलीच आहे! म्हणूनच वेगानी पुढे पडणारी काळाची पावले लक्षात घेत, जरा ‘मी आणि माझे’ याच्या पलिकडचा विचार करूया आणि चला, नाती जपूया!!

No comments:
Post a Comment