आनंदी जगण्यासाठी सकारात्मक बणा .! - काव्यलहरी

डॉ.सुजीतकुमार टेटे

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, January 16, 2020

आनंदी जगण्यासाठी सकारात्मक बणा .!

आनंदी जगण्यासाठी सकारात्मक बणा  .!
प्राचार्य डॉ. सुजितकुमार टेटे
९४०५२४१००४

सकाळची पहिली सूर्यकिरण दिसताच सिन्हाला देखील प्रश्न पडतो जर तो धावणार नाही तर उपाशी राहणार आणि तसाच प्रश्न हरीनाला सुद्धा पडतो तो धावणार नाही तर जीव गमावणार. हरीण धावतो पडतो म्हणून सिंह उपाशी मरत नाही आणि एक दिवस मरायचे आहे म्हणून हरीण सुद्धा धावणे सोडत नाही.  हे सर्व चक्र सुरु असते आणि निर्भर असते फक्त सकारात्मक विचारावर. सिंह आणि हरीण दोन्ही सकारात्मक विचार करतात एक पॉट भरण्यासाठी आणि दुसरा जीव वाचविण्यासाठी तसेच काही घडत असते आपल्या जीवनात. असेच विचार माणसाच्या जीवनात फार महत्त्वाचे असतात. निसर्गाने माणसाला विचारशक्ती अगदी मुक्त हस्ताने बहाल केली आहे. इतर कोणत्याही प्राण्याकडे विचार करण्याची अथवा विचारांची देवाण-घेवाण करण्याची शक्ती नाही. विचारांचा माणसाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. कारण विचार हे सतत मनात स्फुरत असतात. मानसशास्त्रानुसार माणूस दिवसभरात अंदाजे साठ हजार विचार करतो. या विचारांपैकी काही विचार तुम्ही जाणिवपूर्वक करता तर काही विचार तुमच्या विचारसरणीनुसार, संस्कारानुसार तुमच्या मनात स्फुरत असतात. काही विचार हे लहानपणापासून तुमच्यावर झालेले संस्कार, संगत आणि शिक्षण यानुसार तुमच्या मनात निर्माण होत असतात. मात्र तुम्ही चांगले अथवा वाईट कोणतेही विचार केले तरी त्या विचारांचा तुमच्या जीवनावर परिणाम हा होतच असतो. जर तुम्ही चांगले विचार केले  तर जीवनात चांगले घडते आणि चुकीचे विचार केले तर त्याप्रमाणेच जीवन घडत जाते. थोडक्यात माणूस जरी काही काम न करता अगदी रिकामा जरी बसला असेल तरी त्यावेळी त्याच्या मनात विचार सुरूच असतात. अगदी सकाळी जाग आल्यापासून रात्री गाढ झोपेपर्यंत माणूस विचारच करत असतो. जर माणूस सतत विचारच करत असेल तर तो नेहमी आपल्या विचारांच्या संगतीमध्ये जगत असतो असे म्हणावे लागेल. शिवाय विचारांप्रमाणे माणसाचे जीवन घडत असेल तर माणसाने विचार करताना सतत सावध राहणे देखील फार गरजेचे आहे. नकारात्मक विचार जीवनाला चुकीची कलाटणी देतात तर सकारात्मक विचार माणसाला जीवनात यशाच्या शिखरावर नेतात. मात्र विचारांबाबत सावध नसल्यामुळे आजकाल सगळीकडेच नकारात्मक विचारसरणी दिसून येते. मन आणि विचारांचे सामर्थ्य माहीत नसल्यामुळे अनेक माणसे कळत अथवा नकळत सतत नकारात्मक विचार करत असतात. काही जणांना नकारात्मक विचार करण्याची ऐवढी सवय असते की प्रत्येक गोष्टीबाबत त्यांच्या मनात आधी नकारात्मक विचारच पहिला येतो. शिवाय आपण कळत आणि नकळत सतत नकारात्मक विचार करत आहोत याची  जाणिवदेखील या लोकांना नसते. मात्र निसर्ग आपले काम अगदी प्रामाणिकपणे करीत असतो. चुकीच्या विचारांचे परिणाम माणसाला निसर्गनियमानुसार भोगावेच लागतात. यासाठी प्रत्येक माणसाला सकारात्मक विचार आणि मनाचे सामर्थ्य माहीत असायलाच हवे. सतत प्रयत्नपूर्वक Positive  विचार करून तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच यश मिळवू शकता. मात्र त्यासाठी नेहमी Positive  Thinking  अथवा सकारात्मक सोय असायला हवी .

काही लोकांना सतत  नकारात्मक विचार आणि उच्चार करण्याची सवय असते. या दोन्ही गोष्टी माणसासाठी अत्यंत चुकीच्या आहेत. म्हणूनच पू्र्वीच्या काळी शुभ बोल नाऱ्या, शुभं भवतू असे म्हटले जायचे.  यासाठीच माणसाने सतत चांगले आणि पॉझिटिव्ह बोलायला हवे. कारण विचार, उच्चार आणि आचार या तिन्ही स्थरांवर माणसाने जर सतत चांगले आणि सकारात्मक विचार केले तशीच सकारात्मक परिस्थिती माणसाच्या वाट्याला येऊ शकते. नेहमी चांगले, यशाचे, हितकारक, सुखाचे, समाधानाचे, भरभराटीचे, उत्तम आरोग्याचे, समृद्धीचे विचार करणे म्हणजे सकारात्मक विचार करणे होय. यासाठी सणा-सुदीला आपण इतरांना शुभेच्छा देत असतो.

जर एखाद्याला सतत नकारात्मक विचार करण्याची सवय असेल तर त्याचे परिणाम त्याला आयुष्यभर भोगावे लागतात. कारण अशा माणसांच्या आयुष्यात चांगले, हितकारक कधीच घडत  नाही. नकारात्मक विचार सरणीमुळे प्रयत्न करूनही त्यांच्या वाट्याला विपरित परिस्थिती येत राहते. सतत रडणारी, चिडचिड करणारी, दुःख करणारी माणसे आपण आजूबाजूला पाहत असतो. निसर्गाचा नियम आहे तुम्ही जे करता ते तुम्ही निसर्गाजवळ मागत असता. त्यामुळे निसर्गनियमानुसार तशीच निगेटिव्ह परिस्थिती त्या माणसांच्या वाट्याला येत असते. वास्तविक त्यांच्या जीवनात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींना त्यांचे नकारात्मक विचार कारणीभूत आहेत हे न समजल्यामुळे आयुष्यभर ही माणसे नकारात्मक विचार करून स्वतःचे आणि इतरांचे आयुष्य बिघडवतात. विचारांचे सामर्थ्य माहीत नसल्यामुळे अशी माणसे आयुष्यभर नशिबाला दोष देत बसतात.

मनाचा आणि शरीराची एकमेकांशी गाढ संबध असतो. अनेकदा मन दुःखी असल्यास त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर झाल्याचा दिसून येतो. मनातील दुःखद भावनांचे दुष्परिणामदेखील तुमच्या शरीरावर दिसून येतात. म्हणूनच निरोगी राहण्यासाठी सतत सकारात्मक विचार करणे फार गरजेचे आहे. जी माणसे सतत स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल पॉझिटिव्ह बोलतात अथवा विचार करतात. त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्वच प्रभावित करणारे असते. अशी माणसे नेहमी स्वतःला आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना आनंद देतात. सकारात्मक विचारसरणीमुळे त्यांच्यामध्ये भरपूर आत्मविश्वास असतो. ज्यामुळे त्यांच्या जीवनात त्यांना पूरक आणि पोषक वातावरण निर्माण होते. निसर्गनियमानुसार सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या जीवनात नेहमी चांगलेच घडते.

 सतत नवनवीन ज्ञान आत्मसात करा जीवन हे अनेक चांगल्या- चांगल्या गोष्टींनी भरलेले आहे. जगात अनेक सकारात्मक गोष्टी घडत असतात. मात्र माणसे स्वभावानुसार नकारात्मक गोष्टी, गॉसिप यामध्ये जीवनातील बराचसा वेळ वाया घालवतात. जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर चांगल्या आणि सकारात्मक गोष्टींचे ज्ञान मिळवा. या  ज्ञानामुळे तुमचे जीवन आनंदी आणि प्रफुल्लित होईल.धकाधकीचे जीवन आणि सतत वाढणारी चिंता-काळजी ही सर्वाच्याच वाट्याला येत असते. मात्र कामाचा ताण तेवढ्यापुरताच घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही ऑफिस अथवा  कामाच्या ठिकाणी असता तेव्हा घरची चिंता काळजी न करता कामावर लक्ष नियंत्रित करा. ज्यामुळे तुम्हाला कामाचे टेंशन येणार नाही. प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम केल्यामुळे काम वेळेत पूर्ण होईल आणि घरी गेल्यावर तुम्हाला कामाचे टेंशन येणार नाही.

No comments:

Post a Comment

ऑनलाइन शिक्षण - Future Investment !

  ऑनलाइन शिक्षण -  Future Investment ! शब्दांकन - प्राचार्य डॉ. सुजित टेटे  जर कोरोना  संपलाच नाही तर ?  जर शाळा २-३ वर्षे उघडल्याच नाही तर ...

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages