तरुण मानसिक आजाराच्या विळख्यात जाणार का ?
शब्दांकन- प्राचार्य डॉ. सुजित टेटे
मो. ९४०५२४१००४
जागतिकीकरणाच्या जीवघेण्या स्पर्धेत समाजातील सर्वच घटकांना मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. शहरी भाग मानसिक आजाराला बळी पडत असताना ग्रामीण भागातही मानसिक आजाराचे लोण पसरत आहे. नकारात्मक शारीरिक प्रतिमांमुळे निर्माण होणाऱ्या ताणातून राज्याच्या ग्रामीण भागातील १८ ते २५ वर्षांपर्यंतच्या ११ टक्के व्यक्ती नैराश्याला बळी पडत असल्याची गंभीर बाब सर्वेक्षणातून समोर आली आहे.
शाळकरी मुले, रोजगार मिळविणारे तरुण , उत्तम जीवनशैली जगत असलेले तरुण ते ज्येष्ठ नागरिक सर्वांनाच मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. अख्या जगावर कोरोना विषाणूचा प्रभाव पडलेला असून यामधे देशातील २५ ते ३५ वयोगतातील विविध खाजगी क्षेत्रात नौकरी किवा काम करत असलेल्या तरुणावर मोठा मानसिक ताण असल्याचे स्पष्ट चित्र डोळ्यासमोर आहे.
लॉकडाऊन च्या काळात बंद झालेले उद्योग , बंद झालेले खाजगी कार्यालये , हातावरच्या कामावर पोट भरत असलेले लोक यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले आहे. आपले स्वप्न आपल्या डोळ्यासमोर चकणाचुर झाल्याचे बघणारे तरुण नोकरी सोडून घरी बसलेले आहेत. अशा वेळेस त्यांना धीर देण्याची आणि एकटेपणा दूर करण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे.
नकारात्मक शारीरिक प्रतिमा हे मानसिक आरोग्यापुढचे एक मोठे सामाजिक आव्हान असून आता ग्रामीण व निमशहरी भागातही ही समस्या बळावते आहे. नकारात्मक स्वयंप्रतिमा आणि किमान आत्मसन्मान यामुळे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावरही विपरित परिणाम होत असतो.
मानसिकता बदलायला हवी!
टेन्शन, डिप्रेशन…आणि त्यातून क्वचितप्रसंगी उचललं जाणारं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल. अशा अनेक घटना आपल्या आजुबाजूला सतत घडताहेत. मानसिक आरोग्य हा खूप महत्त्वाचा विषय बनला आहे. हल्लीच्या धकाधकीच्या जमान्यात एकूणच ताण खूप वाढलाय. पण यातून बाहेर पडण्यासाठी अनेक मार्गही आहेत. पालकांशी, मित्र-मैत्रिणींशी संवाद, आवडता छंद जोपासणं असं खूप काही. यातलं गांभीर्य लक्षात घेऊन शाळा-कॉलेजच्या स्तरापासूनच मुलांचं समुपदेशन करायला हवं. त्यासाठी मानसिकता बदलली गेली पाहिजे
मानसिक वैफल्य आणि आत्महत्येला प्रवृत्त करण्यास दरवेळेस बाह्यपरिस्थिती कारणीभूत ठरते, असं नाही. काही वेळेस आपल्या मनातील चुकीच्या समजूती कारणीभूत ठरतात आणि मन वैफल्यग्रस्त होतं. सतत आपल्या सुरक्षित कोशात मुलांना वाढवणं, लहानपणापासूनच त्यांना सतत एका पोषक वलयाखाली जपणं या सवयी भविष्यात त्रासदायक ठरतात. मुलांची मनं अर्थातच नाजूक आणि कमकुवत होतात. आता प्रश्न राहिला आम्हा तरुणांचा तर दोस्तांनो, आपलं जीवन इतकं स्वस्त नाही. मोकळेपणाने बोलणं व हसत-खेळत सुसंवाद हाच या सगळ्यावर औषध आहे. आपल्याला लोक काय म्हणतील त्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं? याचा विचार करा.
आपलं जीवन हे धावपळीचं व स्पर्धात्मक झालंय. प्रत्येकाला न थांबता व न थकता कार्य करत राहणं तसंच या स्पर्धात्मक युगात आपलं स्थान निर्माण करणं गरजेचं झालंय. अशा वेळी बहुतांशी लोकांचं मानसिक व शारीरिक आरोग्य बिघडू लागतं. सध्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर मोबाइलचं आकर्षण दिसून येतं. ज्या व्यक्तीकडे स्मार्ट मोबाइल ती व्यक्ती स्मार्ट असा सध्या लोकांमध्ये न्यूनगंड आहे. स्मार्ट असावं पण ते आपल्या बुद्धीचातुर्याने असावं. या स्मार्ट व स्पर्धोत्मक युगात सोशल मीडियाचा वापर नक्कीच करावा परंतु तो एका मर्यादेपर्यंतच असावा. तरुणांमधील हे आत्महत्येचं प्रमाण कमी होण्यासाठी शाळा-कॉलेजातून तसंच सरकारी पातळीवर विविध मानसिक आरोग्यासाठीची शिबिरं राबवली जाणं गरजेचं आहे. प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणं काळाची गरज आहे.
कौन्सिलिंग काळाची गरज-
जगाच्या बरोबरीने चालायचं असेल तर आपल्याला तितकं कृतीशील व तत्पर असायला हवं, हे मान्य आहे. पण त्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करणं योग्य नाही. प्रत्येक क्षेत्रात टिकून राहण्यासाठी स्पर्धेला सामोरं जावं लागतं, पण त्यात यश मिळायलाच हवं या वृत्तीमुळे तरुणांच्या पदरी लवकर निराशा पडते. सोशल मीडियाच्या आहारी जाऊन व त्या सर्व गोष्टी खऱ्या मानून त्याच्या विळख्यात तरुण अडकत चाललेत. पटकन यश मिळवण्याची तरुणांची वृत्ती असल्यामुळे त्यांच्यात सहनशीलता नसते आणि मिळालेल्या अपयशामुळे त्यांचं मानसिक खच्चीकरण होतं. धावपळीच्या आयुष्यात व सतत काहीतरी मिळवण्याच्या धडपडीत तरुण पिढी आपलं आयुष्य जगायचं विसरत चालली आहे. सर्व तरुणांचे कॉलेज पातळीवर कौन्सिलिंग करणं खूप महत्त्वाचं आहे.
आर्थिक प्लॅनिंग महत्त्वाची -
मनस्वास्थ्य बिघडवणारी जी प्रमुख कारणं असतात त्यामध्ये चिंता, काळजी किंवा विवंचना ही प्रमुख असल्याचं संशोधनात आढळून आलंय. 'चिता माणसाला एकदाच जाळत असते, पण चिंता मात्र माणसाला आयुष्यभर जाळत असते' असं म्हटलं जातं. माणसाच्या बहुतेक चिंता, काळज्या किंवा विवंचना आर्थिक बाबींशी निगडीत असतात, असं आढळून आलंय. यासाठी प्रत्येकाने आपल्या आर्थिक आरोग्याची पण काळजी घेणं आवश्यक आहे. भरपूर पैसा कमावला किंवा वाचवला म्हणजे आर्थिक आरोग्य ठणठणीत असतं, असा अनेकांचा गैरसमज असतो. त्यासाठी प्रत्येकाने प्लॅनिंग करणं गरजेचं आहे
उपाय नक्कीच आहेत-
अति तणावाचे परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतात. आपलं मन अनेकदा दुखावलं जातं. त्याची कारणं अनेक असतात, कधी कौटुंबिक कलहांमुळे, शैक्षणिक किंवा नोकरीतील अडचणींमुळे तर कधी इतर नात्यांमधील वादविवाद अशा अनेक गोष्टींचा फरक आपल्या मानसिक आरोग्यावर पडतो. या सर्व विचारांनी गोंधळून जाऊन अनेकदा मुलं आत्महत्या करतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालकांशी होणारा संवाद. तसंच मित्रांशी मनमोकळेपणाने गप्पा होणं गरजेचं आहे. मनावरचा ताण कमी करायला अनेकदा निसर्ग व प्राणीही खुप मदत करतात. मोकळी हवा, हिरवागार निसर्ग किंवा एखादा पाळीव प्राणीही तुम्हाला नैराश्यातून बाहेर पडण्यास मदत करू शकतो. मैदानी खेळ खेळणं, आवडत्या छंदांमध्ये मन रमवणं किंवा गाणी ऐकणं अशा अनेक गोष्टी आपण करू शकतो.
मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करावेत-
तंत्रज्ञानाच्या युगात मानव एकाकी पडत चालला आहे. स्पर्धात्मक युग व आधुनिक जीवनशैलीमुळे कुटुंब व्यवस्थेतील संवाद संपुष्टात आला. संवाद संपल्यामुळे प्रत्येकावर मानसिक ओझं वाढत चाललंय. मनोधैर्याचं अप्रत्यक्षपणे खच्चीकरण होतंय. नवीन पिढी या ओझ्याखाली दबली जातीय. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे. पालकांनी सातत्याने मुलांशी हितगूज केली पाहिजे. मुलांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले पाहिजेत. युवा पिढीचे मनोबल वाढवण्यासाठी शालेय जीवनापासूनच प्रयत्न व्हायला हवे. शाळेच्या वेळेतच मुलांकडून योगासन, ध्यानधारणा करून घेतली पाहिजे. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या दिवसात
संकटांवर करा मात-
जगातली सर्वात सुंदर गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे कुणाशीही होणारा मनमोकळा संवाद. मनात येईल ते समोरच्या व्यक्तीशी स्पष्टपणे बोलणं यामुळे माणसाच्या मनात कुठल्याही प्रकारची भीती वा गैरसमज राहत नाही. मनावरचं दडपण, तणाव दूर होतो. अतितणावामुळे आत्महत्येचे प्रकार घडतात. आपल्याला एखादी गोष्ट येत नाही म्हणून निराश होणं हे चुकीचं आहे. आपल्याला भविष्यात काय करायचं आहे याबाबतचं ध्येय ठरवून घेऊन चालायला हवं. मनमोकळा संवाद साधला पाहिजे, मनमोकळ्या गप्पा मारल्या पाहिजेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही वेळ मिळत नाही, तरीसुद्धा वेळात वेळ काढून आपण मित्र-परिवार यांच्यासोबत मोकळेपणाने बोलायला हवं. त्यामुळे मेंदूवरचा ताण कमी होतो. व्यायाम, योगासनं केली पाहिजेत. तणाव निर्माण झाला तर, मनमोकळ्या गप्पा मारा. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा. चांगली पुस्तकं वाचा. कुठल्याही संकटांना न घाबरता त्यावर मात कशा प्रकारे करता येईल याचा विचार
करा.
अनुभवातून शिका-
आधी महागडं शिक्षण, पुढे नोकरी-व्यवसाय हे चक्र म्हणजे जणू जीवघेणी स्पर्धा झाली आहे. वेगवान जीवनशैली आणि वाढत्या कामाचा ताण यामुळे भारतात अनेक लोकांना नैराश्य येऊ लागलं आहे. करिअरचं टेन्शन आणि त्यातच आलेला सोशल मीडिया यामुळे तरुणांचं मानसिक आरोग्य बिघडत चाललं आहे. समाजात जवळपास प्रत्येक व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचं दिसून येतं. तरूणाई सोशल मीडियामध्ये फारच गुंतत चालली आहे. त्यामुळे नको त्या विश्वात ती रमते. त्याचबरोबर एकाकीपणा, परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास येणारा तणाव यातून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं जातं. आत्ताची तरूणाई याला बळी पडते. मनाच्या या भावनांवर संयम राखता आला पाहिजे. प्रत्येक कॉलेजमध्ये मानसिक आरोग्याविषयी प्रश्न सोडवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेहमी सकारात्मक विचार करा, आपल्याला जे साध्य करायचं आहे ते आपण करू शकतो का? का करतोय? याचा आधीच विचार करून मग पुढे जा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वेगवेगळे अनुभव येत असतात. त्या अनुभवांतून नेहमी शिकण्याचा प्रयत्न करा.
मन मोकळं करा-
सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे मानसिक ताण-तणाव वाढत चालला आहे. हा तणाव मर्यादेत असेपर्यंत घाबरण्याचं कारण नाही. परंतु तो अधिक गंभीर स्वरूप धारण करायला लागला की त्याचे परिणाम नोकरी, नातेसंबंध, व्यवसाय आणि विशेषतः शारीरिक स्वास्थ यांच्यावर झाल्याशिवाय राहत नाही. असं झालं तर मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यायला हवी. त्याबरोबरच आपल्या वर्तनात, दिनचर्येत आणि विचार करण्याच्या पध्दतीत काही साधे बदल केले गेले तर मानसिक तणावावर मात करता येईल. मानसिक तणाव वाढायला लागेल तेव्हा आपल्या कुटुंबियांकडे आणि मित्रांकडे वळा. त्यांना आपल्या मनातलं दुःख सांगा. मन मोकळे झाल्यामुळे तणाव कमी होतो. सकारात्मक विचार करणाऱ्या आशावादी लोकांच्या सतत संपर्कात राहावं त्यामुळे आपल्याही मनावरचा ताण कमी होतो. दररोज व्यायाम करणं, सकस अन्न खाणं, भरपूर झोप घेणं हे उपायही मानसिक तणाव कमी करण्यास उपयुक्त ठरतात.
धडपड फक्त स्वतःसाठी-
सध्या लोकांच्या ढासळलेल्या मानसिक आरोग्याचं प्रमुख कारण म्हणजे प्रत्येक जण फक्त स्वतःच्या सुखासाठीच धडपडतो आहे. जास्तीत-जास्त पैसा कसा कमावता येईल किंवा लोकांमध्ये माझा मानसन्मान कसा वाढेल याकडे प्रत्येकाचं लक्ष असतं. दिवसातले १२-१४ तास काम करून आपण स्वतःचं आयुष्य स्वतःच कमी करतो. अपयश पचवणं कठीण झालं की मग आत्महत्या हा पर्याय जवळचा वाटू लागतो. बाबांनी सायकल घेऊन नाही दिली, परीक्षेत कमी मार्क मिळाले, एकतर्फी प्रेम आहे, लोक निंदा करतात, आणि अश्या बऱ्याच गोष्टींमुळे निराश तरुणाई आत्महत्येचा पर्याय जवळ करू लागली आहे. पण हे आधी मनातून काढून टाकायला हवं. आई-वडिलांनीही मुलांसोबत जास्तीत-जास्त वेळ घालवला पाहिजे. त्याचबरोबर मुलांनी मैत्री ही खूप महत्त्वाची असल्याचं समजून घेऊन चांगले मित्र-मैत्रिणी शोधायला हवेत.
जबाबदाऱ्यांची जाणीव व्हावी-
प्रत्येक पावलावर स्पर्धा निश्चित आहे. आजची तरुण पिढी विज्ञान व तंत्रज्ञान याचं अचूक ज्ञान असणारी पिढी आहे. नेहमीच काहीतरी नवीन, हटके करण्याचा या तरुणांचा प्रयत्न असतो. स्पर्धात्मक विश्वात जगण्यासाठी अनेक अथक प्रयत्न करावे लागतात, तेव्हा कुठं यशाचं शिखर गाठता येतं. परंतु जेव्हा परिश्रम करूनही तरुण अपयशी ठरतात तेव्हा आत्महत्या करण्याचा पर्याय निवडतात. यातून काय बरं साध्य होतं? तरुणांचा निव्वळ बेजबाबदारपणा यातून दिसून येतो. तरुणांची मानसिकता जपण्यासाठी त्यांना योग्य वेळी जागरूक केलं पाहिजे. त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली पाहिजे.

No comments:
Post a Comment