थांबला तो जिंकला..! शब्दांकन- प्राचार्य डॉ. सुजितकुमार टेटे - काव्यलहरी

डॉ.सुजीतकुमार टेटे

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, April 2, 2020

थांबला तो जिंकला..! शब्दांकन- प्राचार्य डॉ. सुजितकुमार टेटे

थांबला तो जिंकला..!
शब्दांकन- प्राचार्य डॉ.  सुजितकुमार टेटे




हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे ,
माणसाने माणसाशी माणसासम वागणे .
माणसाच्या माणुसकीचे सकारात्मक भाव सतत तेवत असावे असे उपरोक्त ओळीतून स्पष्ट होते. माणसाने आपल्या माणुसकीचे महत्व प्रत्येक क्षणाला जपावे आणि मनुष्य हा समाजशील प्राणी आहे त्याचा बोध नेहमीच घेत राहायला पाहिजे. इथेच जगायचे आणि इथेच एक दिवस मरायचे आहे तर मग थोडीसी माणुसकी आणि माणसाविषयी असलेला जिव्हाडा एक क्षण का होईना वाटत गेले तर काय बिघडेल?

"जिंकणे हरणे  खरंच
कळत नाही मनाला,
 मनातले ते रूप सामोरी उभे,
कसे सावरावे त्याने स्वतःला ....!"

रोजच्या धकाधकीच्या जीवनात कधीच विचार केला नाही कि एक दिवस जीवनाच्या शर्यतीत धावणारे लोक पायाला बेड्या ठोकल्यासारखे घरातच राहणार. कुणीही विचार केला नसेल कि धावणाऱ्या रेल्वे , रस्ते , विमान , जहाज आणि सर्वच थांबतील आणि आपल्या एक संदेश देतील कि 'थांबला तो जिंकला'.

आज पर्यंत आपण आपल्या जीवनात एकच सूत्र वापरत होतो 'काळ पुठे चालला थांबला तो संपला' पण आज याच काळाने आपल्याला एक शबक शिकविलेले आहे कि थांबला तो संपत नाही , थांबला तो जिंकू पण शकतो. जिंकण्याच्या शर्यतीत समोर जाण्याच्या शर्यतीत कुठे तरी आपण थांबायला विसरून गेलो होतो.  आपल्या माणुसकीच्या सूत्र मध्ये सुद्धा आपण डोकावून बघितले नाही आणि फक्त जिंकण्यासाठीच धावत सुटलेले होतो. परंतु काळाला हे पटले नाही त्याला वाटलेच कि मनुष्य आता स्वार्थी आणि फक्त स्वतःपुरता जगत आहे आणि त्याला थांबण्याचा आनंद काय असतो ते दाखवावे आणि आज आपण थांबण्याचा आनंद घेत आहोत. दुसरीकडे आपल्या धावण्यामुळे ज्यांचे अस्तित्व धोक्यात आले होते असे निसर्ग  पक्षी , चिमण्या , जलसंपदा , जंगलातील प्राणी आपल्या वसुंधरेवरती मुक्त विहार करताना दिसत आहेत , पक्षी गगनभरारी मारताना दिसत आहेत आणि आपण एक पिंजऱ्यात अडकलेल्या पोपटासारखे त्यांचा  आनंद बघून पिंजऱ्या बाहेर जाण्याची आतुरतेने वाट बघत आहोत. काही दिवस पिंजऱ्यातच राहा तेच योग्य आहे आपल्यासाठी, निसर्गाचा राग शांत झाला कि आपल्याला पुन्हा मुक्त विहार करण्यासाठी तो नक्कीच प्रवृत्त करेल हे  निश्चितच !

आज आपली परिस्थिती अशी झालेली आहे कि आपण मानव असून सुद्धा माणसाला स्पर्श करू शकत नाही , माणसाला माणसाशी   बोलतांना सुद्धा सुरक्षित अंतर ठेवावे लागत आहे आता आपल्या माणुसकीची सुद्धा किंमत संपलेली आहे म्हणायला काही हरकत नाही आणि याचे घरे दोषी मानवी प्रवृत्तीच आहे असे म्हणायला चुकीचे ठरणार नाही. निसर्गात केलेलं अतिक्रमण आपल्याला आज भोगावा लागत आहे. जर आपण असेच केलेले अतिक्रमण थांबविले नाही तर पाणी आणि ऑक्सिजन या सारखे आवश्यक असलेले घटक आपल्याला पुन्हा थांबवणार हे निश्चितच!

निसर्गाने आपल्याला भुरभुरून दिलेले आहे आपल्याला त्याचा समतोल राखून निसर्गासोबत चालावे लागेल, आज आपण कितीही विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकाचा उपयोग केला तरी माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचे महत्व आपल्यामध्ये नेहमीच असायला पाहिजे. मानवी हस्तक्षेपातून निर्माण झालेल्या विषाणूने आपल्याला आज सामाजिक अंतर ठेवणे हेच एक उपाय आहे याचे जिवंत उदाहरण आपल्याला दिलेले आहे अर्थात मानवाने निसर्गात केलेले हस्तक्षेपामुळे आज आपल्याला आपल्या कुटुंबापासून , जवळच्या व्यक्तीपासून ३ मीटर अंतर ठेवलं तर जगाला अशी अदृश्य शिक्षा दिलेली आहे असे म्हंटले तर चुकीचे ठरणार नाही.

जगातील स्वतःला व्यस्त समजणारे लोक आज रिकामटेक झाल्याचे बघायला मिळतात काय फरक पडला १० दिवस रिकामे असून सुद्धा आपण शर्यतीत हरलो का ? नाही ना मग या गोष्टी पासून सुद्धा आपल्याला एक बोध मिळतो कि काहीच बिघडत नाही काही काळ थांबल्याने थांबून बघा कुटुंब सोबत, जगून घ्या काही क्षण कुटुंब सोबत , असे दृश्य कधी बघायला मिळत नाही . मुक्त विहार करू द्या निसर्गातील पशु पक्षांना जगू  द्या त्यांना सुद्धा त्यांचे जीवन. आपल्याला जिंकाचे असेल तर असेच आता थांबावे लागेल हे निश्चितच !

जिंकणे सोपे तर
हरणे कठीण आहे,
हाती आलेला डाव
गमावणे कठीण आहे ....

आपल्याला थांबून हार नाही मानायची आहे कारण जिंकण्यासाठी थांबूनच विचार करावा लागतो. आत्मपरीक्षण करावा लागतो , स्वतःला परिपूर्ण करावा लागतो आणि जेव्हा आपण परिपूर्ण झालो कि निश्चितच आपल्याला यश मिळेल म्हणून आता एकच सूत्र थांबला तो संपला नाही थांबला तो जिंकेल सुद्धा.

शब्दांकन- प्राचार्य डॉ.  सुजितकुमार टेटे

 










No comments:

Post a Comment

ऑनलाइन शिक्षण - Future Investment !

  ऑनलाइन शिक्षण -  Future Investment ! शब्दांकन - प्राचार्य डॉ. सुजित टेटे  जर कोरोना  संपलाच नाही तर ?  जर शाळा २-३ वर्षे उघडल्याच नाही तर ...

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages