- काव्यलहरी

डॉ.सुजीतकुमार टेटे

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, July 16, 2020

कठीण प्रसंगी शिक्षण प्रणाली प्रभावित होणार का ?

शब्दांकन- प्राचार्य डॉ . सुजित टेटे 
मो ९४०५२४१००४

संपूर्ण जगाला हादरवून सोडलेला कोविड  १९ विषाणू आपले प्रभाव सतत दाखवत आहे.यावर उपाय म्ह्णूनन जगातील बहुतांश देशांनी एकच उपाय योजिला तो म्हणजे 'लॉक डाऊन'. कोविडचे वाढते प्रमाण बघता भारतात सुद्धा पहिल्या लॉकडाऊन चे निर्णय घेण्यात आले आणि सुरु झाले संघर्ष सर्वांनी प्रत्येक्षात अनुभवलेले आहे. यामध्ये सर्वात जास्त गैरसोय झाली ती हातावर पोट भरणाऱ्या मजुरांना. पोटाची खळगी भागविण्यासाठी परराज्यात काम करत असतांना अचानक आलेला प्रलय त्यांना व त्यांच्या कुटुंबांना हादरवून सोडला. रोजगार संपल्यामुळे सुरु झाला परतीचा प्रवास. लॉकडाऊन संपेना त्यामुळे सर्वांचे आशा निराशा झाल्याचे स्पष्ट दिसत होते परंतु या स्थलांतराशिवाय कोणताही उपाय यांच्या कडे नव्हता. या बरोबर सर्वात मोठा प्रभाव पडला तो देशाच्या निर्माण करणाऱ्या शिक्षण प्रणाली वर . 

देशात सुमारे ५ लक्ष स्वयंअर्थसहायित शाळा आहेत आणि या मध्ये सुमारे ५० - ६० लक्ष तुटपुंज्या पगारावर काम करणारे सुशिक्षित बेरोजगार शिक्षक म्हणून काम करतात. या शिक्षकांना सरासरी ५-१० हजार रुपये इतके पगार मिळायचे आणि कुठलेही भत्ते , सोयी सुविधा , पेन्शन या गोष्टी कधी स्वप्नातही बघीतलेले नसावे हे कटू सत्य आहे. सुट्या घेतले तर ते सुद्धा पगारातून कापले जाते, अर्जित रजा , वैद्यकीय रजा कुठलीही सवलत यांना नाही. असे असले तरी देशाचे शैक्षणिक स्तर आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी या शिक्षकांचा सिन्हाचा वाटा आहे.परंतु आज या राष्ट्रनिर्माण करणाऱ्या शिक्षणावर संकट असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. 

२१ वे शतक हे तंत्रज्ञानाचे आणि माहिती संप्रेषणाचे आहे यामध्ये डिजिटल इंडिया या गोष्टीला सर्वांनी समर्थन केलेला असून तंत्रज्ञानाचा वापर सर्व क्षेत्रात मोठ्या झपाट्याने वाढलेला आहे. डिजिटलायझेशन या कडे सर्व क्षेत्रांनी मोठ्या झपाट्याने लक्ष केंद्रित केले असून   संपूर्ण जीवनशैली तंत्रज्ञानावर अवलंबून असल्याचे बघावयास मिळते .

सर्वात जास्त तंत्रज्ञानाचा उपयोग करणारे क्षेत्र म्हणजे शिक्षण क्षेत्र. सर्व शाळा डिजिटल , अभ्रासक्रम डिजिटल , शिक्षक सुद्धा अद्यावत संपूर्ण यंत्रणा डिजिटल असून लॉकडाऊन पूर्वी या गोष्टीचा सर्वांनी प्रशंसा आणि उपयोग केलेला आहे हे सत्य  नाकारता येत नाही. परंतु आताच्या घडीला डिजिटल शिक्षणाला विरोध होत असल्याचे चित्र बघावयास मिळते. 

शिक्षण देणारे शिक्षक आणि शिक्षण घेणारे विधार्थी या दोन्ही समाजातील घटकांना बघतांना एक प्रश्न पडतो तो म्हणजे "शिक्षणाचा उद्देश काय ?"फक्त पैसा कमावणे आणि पैसा वाचविणे हाच आहे का ? शिक्षणाचा चेहरा मोहरा समाजातील गरजेनुसार बदलत गेलेला आहे. शिक्षणाचा उद्देश लोकशाहीत सुजाण नागरिक बनावा , लोकांना समाजातील मुख्य प्रवाहात आणणे, २१ व्या शतकातील तंत्रज्ञान आणि औद्योगिक विकासावर त्यांना तयार करणे आहे.

लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाले आणि या खाजगी शाळेत शिकविणारे शिक्षक तुटपुंज्या पगारावर काम करत होते परंतु शाळा बंद असल्यामुळे समाजातील काही पालकांनी फीस भरायला स्पष्ट नकार दर्शविला असून आपल्या पाल्याना फीस वाचविण्याच्या बेतात शासकीय शाळा कडे धाव घेतल्याचे चित्र बघावयास मिळते.
या बदलाचा सर्वात मोठा परिणाम खाजगी कॉन्व्हेंट शाळा च्या शिक्षकावर झालेला दिसून येतो.
एकी कडे दर्जेदार गुणांवत्तापूर्ण शिक्षण देणारे शिक्षक आज मनरेगा च्या कामावर जात आहे, रोजगार हमी चे काम करीत आहे, फळ आणि भाजीपाला विकत आहे.
इतिहासात पहिल्यांदाच सर्वांचे आदराचेस्थानी असलेल्या शिक्षकांवर आज ही वेळ आलेली आहे.

सर्व आव्हाने शिक्षकांना पेलायची आहेत, पुन्हा संघर्ष करायचा आहे आपले अस्तित्व टिकवायचा आहे, आपल्या समाजाने आज आपल्याला कठीण प्रसंगी आपली खरी किंमत काय आहे हे दाखविलेले आहे. खचू नका, रुसू नका
चेहऱ्यावरचे तेज फिके पडू देऊ नका कारण शिक्षणाशिवाय तुरुणोपाय नाही आणि गुरू विना जगी थोर काही नाही.


No comments:

Post a Comment

ऑनलाइन शिक्षण - Future Investment !

  ऑनलाइन शिक्षण -  Future Investment ! शब्दांकन - प्राचार्य डॉ. सुजित टेटे  जर कोरोना  संपलाच नाही तर ?  जर शाळा २-३ वर्षे उघडल्याच नाही तर ...

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages