- काव्यलहरी

डॉ.सुजीतकुमार टेटे

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, November 27, 2019

आनंदी जीवनाचा मार्ग- सहनशीलता ! 
शब्दांकन- प्राचार्य डॉ . सुजितकुमार एच. टेटे 

"आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे!" किती सुंदर आणि मार्मिक संदेश देतात या कवितेच्या ओळी! आपण आनंद शोधण्यात व्यस्त आहोत परंतु ठरवलेली दिशा मात्र कुठे तरी शॉर्ट कट असल्यासारखी शोधत बसतो. क्षणात आनदं मिळावा व आपल्याला क्षणभन्गुर ताजेतवाने करावे असे सर्वांनाच वाटते. परंतु व्यस्थ जीवनात आनंदाच्या शोधात आपण किती खपतो हे आपल्यालाच माहिती आहे. 
"आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवाळावा !" असे आयुष्य सर्वांच्याच नशिबी नसते. त्यासाठी असे नशीब आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात बदल करून बनवून घ्यावे असे मला वाटते. त्यासाठी गरज आहार सहनशीलता आणि सहिष्णुतेची. 
अंतर्मुखता, गांभीर्य, धैर्य, शीतलता, नम्रता, संतुष्टता, सरलता हे सर्वही सुंदर गुण आहेत. या सर्वही गुणांमध्ये आणखी एक महान गुण आहे, सहनशीलता आणि सहिष्णुता.  कोणतंही श्रेष्ठ उद्दिष्ट गाठायचं म्हणजे सारं काही सहन करावं लागतं. यावर आधारित एक मार्मिक कथा सांगावीशी वाटते . एकदा एक गुराखी चरण्यासाठी जंगलात घेऊन गेला होता. गुरांना चरण्यासाठी सोडून दिल्यावर एकटाच एका झाडाखाली बसला. वेळ घालवण्यासाठी म्हणून जवळच पडलेल्या एका दगडाने दुसऱ्या दगडावर आघात करू लागला. दोन-तीन आघात झाल्याबरोबर तो दगड तुटला व थोडय़ा अंतरावर जाऊन पडला.  गुराख्याने दुसरा दगड घेतला व आता या दगडावरही तो तसेच आघात करू लागला. या दगडाने मात्र ते सर्व घाव सहन केले व आश्चर्याची गोष्ट म्हणजे संध्याकाळपर्यंत त्या दगडाचे एका सुंदर मूर्तीत रूपांतर झाले. त्या गुराखीने ती मूर्ती तेथेच ठेवली व गुरांना घेऊन निघून गेला. रस्त्यावरून जाणाऱ्या शेतमजुरांना जेव्हा ती मूर्ती दिसली तेव्हा त्यांना वाटले की हा तर चमत्कारच झाला. सकाळी तर येथे मूर्ती नव्हती. प्रभूने आपल्यासाठीच ही मूर्ती पाठवली असेल. अवश्य आपणास या मूर्तीसाठी मंदिर बनवावे लागेल, असे म्हणून ग्रामस्थांनी सगळ्यांच्या सहयोगाने तेथे मंदिर बनवून त्यात या मूर्तीची स्थापना केली.
या मूर्तीवर वाहण्यासाठी नारळ फोडायला दगड हवा होता म्हणून एक ग्रामस्थ खाली पडलेला एक दगड उचलतो तर तो तोच दगड असतो जो त्या गुराख्यांच्या फक्त दोन-तीन प्रहारांनी तुटलेला असतो. त्याला मंदिराच्या दरवाजाजवळ ठेवले जाते. आता रोज त्याच्यावर नारळ फोडले जातात. एकदा कुणीही नसताना त्या मूर्तीने अचानक दरवाजातील दगडाला विचारले, ‘काय मित्रा, कसा आहेस?’ तेव्हा उत्तरादाखल दगड म्हणाला, ‘‘काही नको विचारू बाबा. दिवसभर झालेल्या आघातांना तू सहन केलंस, पण आता तुझी पूजा होते आहे, पण मी मात्र एक-दोन आघातांनी घाबरून गेलो. पण आता मात्र रोजच माझ्या शरीरावर आघात होत आहेत. याचा पश्चात्ताप मला आयुष्यभर राहील.’’ कदाचित म्हणूनच म्हटले जाते, ‘टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.’ दगडापासून मूर्ती जेव्हा घडत असते, तेव्हा तिला घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. दगडापासून मूर्ती जेव्हा घडत असते, तेव्हा तिला घाव मोठय़ा आनंदाने सहन करावे लागतात. याउलट जे दगड हे घाव न सोसता तुटून पडतात. त्यांचा वापर मंदिराच्या बांधकामात केला जातो. अर्थात "Challenges are launching pad of our life." संघर्षाशिवाय  सुगीचे दिवस येत नाही आणि सहनशीलतेविना माणसाला जीवन जगण्याची मजा येत नाही. जीवनात येणार प्रत्येक संघर्षाला सामोरे जाऊन आपली दिशा आणि उद्दिष्ट गाठणे यातच आपले भले आहे. 

मात्र बऱ्याच अंशी जनमानसात सहनशीलतेचा अभाव दिसतो. ‘आम्हीच का म्हणून सहन करायचं,’ असा प्रश्न सगळ्यांना सतावत असतो, माझ्याऐवजी दुसरा कोणी असता तर कधीच एक घाव दोन तुकडे करून मोकळा झाला असता. आपल्याला वाटतं, समोरची व्यक्ती बदलत नाही, पण जर तो बदलत नाही, आपण तर बदलू शकतो ना! आपली कृती त्याची वृत्ती बदलू शकते. म्हणूनच असं म्हटलं जातं, ‘पृथ्वीला गालिच्यांचे चादर घालण्यापेक्षा  स्वतःच्या पायात चपला घालणे आवश्यक आहे. ’ सहनशील व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत उदास होत नाही, खचून जात नाही. म्हणूनच तर म्हटले जाते- जो सहन करतो, तोच शहेनशाह बनतो.  
माणसाने सहिष्णु असावे म्हणजे नेमके काय असा प्रश्न अनेकांना पडतो. आपल्या जीवनात अवतीभोवती अनेक प्रकारच्या निरनिराळ्या व्यक्ती वावरत असतात. सर्वांचे  स्वभाव, किंवा त्यांच्या वृत्ती-श्रद्धा-प्रथा-वर्तणुकी ह्या गोष्टी विभिन्न प्रकारच्या असू शकतात. अशा भेदांवरुन त्यांतील कुणाही व्यक्तीचे मूल्यमापन न करणे, ह्यास 'सहिष्णुता' असे ढोबळ मानाने म्हणता येऊ शकेल. इतरांविषयीचा आपला दृष्टिकोण सौम्य आणि लवचिक असणे इथे गरजेचे असते. समोरचा माणूस रूपाने, स्वभावाने, वृत्तीने कसाही असला, तरी त्याला तसे असण्याचा हक्क आहे, ही गोष्ट ध्यानी ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. आपल्यापेक्षा भिन्न विचार, वेगळ्या आवडीनिवडी, आणि आपल्याला न पटणारी वर्तणूक बाळगणार्‍या व्यक्तीप्रति  सहनशीलता दाखवून, त्याच्याशी बोलणे-वागणे म्हणजे सहिष्णुता होय. रोजच्या सामाजिक जीवनात निरनिराळ्या कारणांनी ज्यांच्या-ज्यांच्याशी आपला संबंध येतो, त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा अनेक वेळा पूर्वग्रह असतो. हा पूर्वग्रह पूर्णपणे वजा करून त्या व्यक्तीकडे पाहणे हे सहिष्णुतेचे लक्षण होय.
सहिष्णुतेची नेमकी व्याख्या करणे अवघड आहे. फार तर असे म्हणता येईल, की सहिष्णुता हा माणसाचा एक असा नैतिक गुण आहे, जो माणसाला त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारच्या व्यक्तींच्या आणि समूहांच्या व्यवहारांकडे सकारात्मक दृष्टिकोणांतून पाहण्याचे बळ देतो. नैतिक विचारातच इतरांविषयीचा आदर, चांगुलपणा, आणि न्याय् दृष्टिकोण हे सामावलेले असतात. जी माणसे संवेदनशील असतात ती इतरेजनांचे विचार, भावना, आणि अनुभव यांबद्दल सहवेदना बाळगत असतात. ती जीवनात खडतर अनुभव घेतलेल्या एखाद्या इसमाच्या कडवट बोलण्यावर उलटून त्यास तेवढीच कडवट प्रतिक्रिया देत नाहीत. कारण तसे करणे असहिष्णुपणाचे होईल हे ते जाणतात. अशावेळी स्वत:ला त्या इसमाच्या जागी कल्पून, त्याच्यासारखाच खडतर अनुभव स्वत:ला आला, तर त्या प्रसंगी आपण कसे वागू हा प्रश्न ते स्वत:ला विचारतात. असे करणे हे समाजाभिमुख असण्याचे लक्षण होय.

3 comments:

  1. अत्युत्तम,,अप्रतिम,,Heart touch

    ReplyDelete
  2. अत्युत्तम,,अप्रतिम,,Heart touch

    ReplyDelete

ऑनलाइन शिक्षण - Future Investment !

  ऑनलाइन शिक्षण -  Future Investment ! शब्दांकन - प्राचार्य डॉ. सुजित टेटे  जर कोरोना  संपलाच नाही तर ?  जर शाळा २-३ वर्षे उघडल्याच नाही तर ...

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages