मनातील चांदणे....प्रत्येक्षात उतरावा ! प्राचार्य डॉ सुजितकुमार टेटे - काव्यलहरी

डॉ.सुजीतकुमार टेटे

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, January 30, 2020

मनातील चांदणे....प्रत्येक्षात उतरावा ! प्राचार्य डॉ सुजितकुमार टेटे

मनातील चांदणे....प्रत्येक्षात उतरावा !
प्राचार्य डॉ सुजितकुमार टेटे
मो ९४०५२४१००४

"जो बीत गयी सो बीत गयी तक़दीर का शिकवा कोण करे ?
जो तिर कमान से निकल गया उस तीर का पीछा कोण करे ?"


नशिबाला दोष देत बसू नका तर नशिबात जे मिळाले नाही ते मिळविण्यासाठी स्वतःला त्या लायक बनवा कि नशिबात असलेल्या गोष्टी पेक्षा जास्त आनंद तुम्हाला मिळेल. नशीबवान व्यक्ती तेच असतात जे आपले मार्ग स्वतः शोधून नवीन दिशा गाठतात आणि आपली वेगळी ओळख बनवितात. नशिबात रेडिमेड यशाला आपले achievement न समजता आपल्या  परिश्रमातून जे यश आणि शाबासकी आपल्याला मिळते तेच आपले खरे   achievement म्हणायला खोटे ठरणार नाही.
जीवन हे अनुकरणातून आणि अनुभवातून घडत असते. जिवनातील आमूलाग्र बदल आणि त्यामधून मिलेली शिकवण माणसाला चिरकाल लक्षात असते आणि त्याचे महत्व सुद्धा अनन्य साधारण असतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला स्वतःसाठी कमी वेळ आहे आणि त्यामुळे आपल्या कर्तव्याच्या आणि जीवनाच्या प्रलयात  सतत तो वाहत आहे. पण त्यालाच "जिना उशी का नाम है " म्हणायला काही हरकत नाही.
मनातील चांदणे जेव्हा आपल्या दृष्टी पटलावर प्रत्येक्षात दिसतात तेव्हा आपल्या प्रत्येक्ष कर्तव्याची जाणीव होते आणि रंगविलेले  स्वप्न एकांतात चकणाचुर झालेले दिसतात. जवाबदारीच्या मथड्याखाली भल्लेभले शरणागती पत्करलेला आपल्याला दिसतात. जीवनाच्या सुखद आनंदसाठी आपण खूप मोठंमोठाली स्वप्न बघतो परंतु स्वप्न पूर्ण करतेवेळी येणाऱ्या अडचणीला सामोरे न जाता आपला स्वप्न जवाबदारीच्या कात्रीने कापतकापत स्वप्न पूर्ण न झालेचे शोक व्यक्त करत असतो. "Life is a game play it well, life is a journey keep going ahead" या ओळीतून जीवन जगण्याची खरी युक्ती समोर येते. जीवनात बघीतलेली स्वप्न पूर्ण करण्याचे धाडस आपल्या हृदयात नेहमीच तेवत ठेवा कारण जीवन हे एक खेळ आहे आणि तो खेळ आपल्याला सर्व निकषानुसार खेळायचं आहे आणि घवघवीत विजयाची प्रतिपूर्ती साजरी करायची आहे.
 यावरून एक सुंदर कथा आठवते, एक वेळा नेपोलियन बोनापार्ट आपल्या लहानपणी मित्रांसोबत खेळात होता, त्यावेळी जवळून एक साधू ज्योतिषी जात होते. नेपोलियन चे सर्व मित्र आपले भविष्य बघण्यासाठी आपले हात समोर करून ज्योतिषीच्या भाकितांची वाट  बघत होते. सर्वांचे भविष्य सांगून झाले आणि शेवटी नेपोलियनला पण आपले भविष्य जानुज घेण्याची उत्सुकता होती त्यामुळे त्याने आपले हात समोर केले आणि ज्योतिषीने भाकीत केले कि तुझे भविष्य अंधारात आहे, तुझ्या हातातील रेषा एकमेकांना जुळलेल्या आहेत त्यामुळे तू तुझ्या जीवनात यशश्वी होऊ शकणार नाही. हे ऐकून नेपोलियन दुखी, निराश झाला आणि ठरविले कि हातातील रेषा जुळले आहेत त्यामुळे माझे भविष्य अंधारात आहे त्यामुळे त्यांनी ठरविले कि हातावरील रेषा ब्लेडने कापून वेगळे करायचे आणि आपले भविष्य बदलून घ्यायचे. आपल्या आत्मविश्वास आणि चतुर बुद्धीच्या बळावर याच नेपोलियन ने जगावर राज्य केले. नशिबावर विश्वास ठेवून शोक व्यक्त करू नका तर आपल्या आत्मविशास आणि INTERNAL WILL POWER वर विश्वास असूद्या.
तू न थकेगा कभी,
तू न थमेगा कभी ,
तू न मुड़ेगा कभी,
कर शपथ कर शपथ कर शपथ !
अग्निपथ , अग्निपथ , अग्निपथ !
हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या या ओळी जीवनातील यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी TURNING POINT म्हणायला काही हरकत नाही असे मला वाटते. कारण थांबला तो संपला हि क्लुप्ती आपण कधीच विसरू शकत नाही. थांबून संपण्या पेक्षा लढून संपले तरी चालेल पण हार मानून आपल्या मनाला खरे समाधान आपण पचवू शकणार नाहीत हे महत्वाचे आहे.
जे ठरवले आहे ते पूर्ण करण्याचे सामर्थ तुमच्यात असुद्या , खंबीर नेतृत्व करून आपल्या LIFE ला पुन्हा Beautiful कशे करता येणार याकडे लक्ष असुद्या.

"काय  सागरी तारू लोटले परताया मागे ,
असे का हा आपुला बाणा,
त्याहून घेऊ जळी समाधी सुखे ,
कशासाठी जपावे पराभूत प्राणा."
या कोलंबस यांच्या गर्व गीतातून  जीवनातील येणाऱ्या अडथळ्यांना घावरून आलेले स्वप्न आणि आपले दिशा न बदलता सतत चालत असले पाहिजे पराभूत होऊन जगण्या पेक्षा  येणाऱ्या संघर्षाशी दोन हात करून जगायला पाहिजे. जीवनात संघर्ष आणि समस्या कधीच संपणार नाही परंतु त्यांना face करण्याचे कौशल्य आपल्या मध्ये रुजविणे आवश्यक आहे.
"Challenges are the launching pad of our life "  कीर्तीचे कळस गाठण्यासाठी संघर्षाच्या तापलेलया तव्याचे चटके जो पर्यंत आपण सहन करणार नाही तो पर्यंत आपला समाज आणि आपल्या जवळील दुरून तमाशे बघणारे लोक आपल्या internal soul ची खरी ताकद समजत नाही. जे ठरवता ते करून दाखवायचे धाडस बाळगा Believe in yourself the world will be in your feet.  स्वतःवर विश्वास ठेवा आपल्यातील स्व ची खरी शक्ती प्रत्येक्षात आणा आणि आपले जीवन किती सुंदर आहे हे आपणच ठरवा. मनातील चांदणे प्रत्येक्षात उतरविण्यासाठी खचू नका.





1 comment:

ऑनलाइन शिक्षण - Future Investment !

  ऑनलाइन शिक्षण -  Future Investment ! शब्दांकन - प्राचार्य डॉ. सुजित टेटे  जर कोरोना  संपलाच नाही तर ?  जर शाळा २-३ वर्षे उघडल्याच नाही तर ...

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages