उद्देशाची निश्चिती... एक अंतिम सत्य..! शब्दांकन प्राचार्य डॉ. सुजितकुमार टेटे - काव्यलहरी

डॉ.सुजीतकुमार टेटे

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, April 23, 2020

उद्देशाची निश्चिती... एक अंतिम सत्य..! शब्दांकन प्राचार्य डॉ. सुजितकुमार टेटे

उद्देशाची निश्चिती... एक अंतिम सत्य..!
शब्दांकन प्राचार्य डॉ. सुजितकुमार टेटे
मो . ९४०५२४१००४ 

ज्याला आपण कुठे जाणार हे निश्चित माहिती असते , त्याला वाट करून देण्यास जग नेहमीच तयार असते . पण ज्याला आपण नेमके कुठे जाणार आहोत , हेच माहित नसते, त्याला वाट कशी आणि कोण देणार ?
समजा , आपण मार्केटमध्ये आलो आहोत. आपल्याला काहीतरी खरेदी करायची आहे; पण काय खरेदी करायचे हे ठरलेलले नाही तर आपल्याला कपडे घ्यायचे असतील तर आपण कपड्याच्या दुकानात जाऊ, धान्य खरेदी करायचे असेल तर ध्यान्याच्या दुकानात जाऊ: पण समजा , आपल्याला नेमके काळात नाही म्हणून आपण दुसऱ्या कुणालातरी विचारले 'काय हो , मी कोणत्या दुकानात खरेदी करू ?' ती व्यक्ती म्हणेल , ' तुम्हाला काय घ्यायचे आहे ,  धान्य , भाजीपाला कि आणखी काही , ते सांगा म्हणजे तुम्ही कोणत्या दुकानात खरेदी करावी हे आम्ही सांगू शकू !' 
आपल्याला निश्चित काय हवे आहे. हे आपण जाणले पाहिजे , तरच इतर आपल्याला मदत करू शकतील आणि आपणही स्वतःला मदत करू शकू, उत्तम यश मिळवू शकू. 
आपल्या जीवनाच्या दिशा ठरवणे , उद्दिष्ट ठरवणे सर्वस्वी आपल्या हातात आहे . जो हा अधिकार दुसऱ्याला देतात ते त्यांच्या अधिपत्य खालील गुलामगिरीचे जीवन स्वीकारतात किंवा बऱ्याच वेळा आपल्या जीवनाची दिशा ठरविता न आल्यामुळे वाऱ्यावर उडणाऱ्या पालापाचोडयासारखे किंवा तुटलेल्या पतंग सारखे दिशाहीन जीवन जगात राहतात. 
आपली स्थिती सुधारावा , आपल्याला यश मिळावे , आपण जीवनात काही मिळवावे , श्रीमंत व्हावे असे आपल्याला वाटत असते : पण आहे ही  स्थिती सुधारण्यावर, यश मिळवण्यावर , काही कमावण्यावर , श्रीमंत होण्यावर आपण आपले लक्ष केंद्रित केलेले नसते. त्यामुळे त्या अनुशंघाने काही कृती करण्याचा साधा प्रयत्न ही आपल्या हातून होत नाही. आपल्या जीवनाचे ध्येय ठरविणे किंवा उद्देश निश्चित करणे म्हणजेच आपण यशस्वी होण्या कडे वाटचाल करावयास सुरु करणे होय. 
इथे महाभारतातील एक प्रसंग आठवतोय कौरव पांडव राजपुत्राचे शास्त्र विध्येचा शिक्षण संपल्यानंतर द्रोणाचार्यानी त्यांची परीक्षा घेतली . धनुर्विध्येचि परीक्षा करण्यासाठी त्यांनी एक उंच झाडाच्या वरच्या फांदी वर एक पक्षी ठेवला. प्रत्येक राजपुत्राला पुढे बोलावून धनुष्यास बाण लावून त्या पक्षाच्या डोळ्यावर नेम धरण्यास सांगितले : पण बाण  सोडण्यापूर्वी द्रोणाचार्य त्यांना प्रश्न विचारून पक्षावर नेम धरला कि ते त्याला प्रश्न विचारात , ' आता तुला काय दिसते ?' प्रत्येक राजपुत्राने त्यांना दिसत होते ते सांगितले. कुणी म्हणाले 'मला झाड , झाडाच्या फांद्या , त्यावरील पक्षी आणि इतरही अनेक गोष्टी दिसतात .'  अशी उत्तरे देण्याऱ्या कोणत्याही राजपुत्रास बाण सोडण्यास अनुमती दिली नाही. आता अजरुनाची वेळ होती. त्याने आचार्यांना वंदन करून धनुष्यास बाण लावला आणि पक्ष्याच्या डोळ्यावर नेम धरला. आचार्यांनी त्यास विचारले, ' अर्जुन तुला आता काय दिसते ? ' अर्जुनाने सांगितले ,'आचार्य , मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतो.' द्रोणाचार्यानी अर्जुनाचे उत्तर ऐकताच त्यास बाण सोडण्यास अनुमती दिली . अर्जुनाने अचूक लक्षवेध साधला. द्रोणाचार्यानी इतरांना बाण सोडण्यास अनुमती दिली नाही कारण ज्या लक्षचा वेध घ्यायचं होत त्या लक्ष्यावर त्यांची दृष्टी आणि चित्त एकाग्र झाले न्हवते. उलट ते इतर गोष्टी बघत होते साहजिकच त्यांनी बाण सोडला असता तरी ते नेमका लक्षभेद  करू शकले नसते; पण अर्जुनाची दृष्टी आणि चित्त आपल्या लक्ष्यावर केंद्रित झालेले होते त्यामुळे साहजिकच तो लक्षवेध करू शकला. 

वरील उदाहरणावरून असे दिसते कि , आपल्याला ज्यामध्ये यशस्वी व्हायचे आहे त्या गोष्टीसाठीही आवश्यक असलेल्या गोष्टीवर आपले लक्ष पूर्ण केंद्रित झाले पाहिजे. तसे लक्ष केंद्रित झाले तरच आपल्या हातून उत्तान कृती होऊ शकते. आपले संपूर्ण लक्ष आपल्या ध्येयावर केंद्रित झालेले असेल तरच आपल्याला अपेक्षित यश मिळते ; पण आपले स्वतःचे ध्येयच आपल्याला जर माहिती नसेल तर आपण आपले लक्ष त्यावर केंद्रित करणार कशे ? आणि अपेक्षित यश मिळणार कशे ? 
अनेकजण अनेक प्रकारचे स्वप्ने पाहत असतात पण सगळ्यांचे स्वप्न त्यांचे ध्येय नसतात . बरेच जण दिवा स्वप्नातच रमलेले असतात . अनेकजण शिक्षण घेत असतात . पण शिक्षण घेऊन आपण काय करायचे हे फारच कमी ठरविलेले असते. लाट सांगायचं झाले तर वास्तव्याचे भान ठेवून योजना आखावयास हव्या तर त्या प्रत्येक्षात आणणे शक्य होणार. बऱ्याच वेळा योजना असफल होण्याचे कारण असते आपला उतावळा स्वभाव. आपल्याला सर्व काही अगदी क्षणार्धात घडावे असे वाटत असते. 
आजकाल तरुणांची अशी वृत्ती दिसते कि , ' मनात आले कि ते सर्व झाले पाहिजे. ' त्यांच्या कडे धीराने वाट पाहण्याची क्षमता कमी असते त्यामुळे 'कृती यशस्वी होण्यासाठी त्यांनी प्रथम एखादी पद्धत वापरलेली असेल आणि तिच्यामुळे चटकन उत्तर मिळत नसेल तर ते ती पद्भव बदलून लगेच दुसरी पद्धत स्वीकारतात. आपण इथे हेच विसरतो कि कोणत्याही गोष्टीला एक विशिष्ट कालावधी लागतो. तो पूर्ण झाला नाही तर ती कृती योग्य 'फळ देत नाही . हा निसर्गाचा नियम आहे .' 

एक ना धड भराभर चिंद्या अशी वेळ आपल्यावर येते त्यामुळे आपल्याला आपले ध्येय ठरवून समोर येणारे संघर्षांना पेलत प्रवेश करायचा असतो आणि  यशाचे शिखर गाठायचे असते.   









 




















No comments:

Post a Comment

ऑनलाइन शिक्षण - Future Investment !

  ऑनलाइन शिक्षण -  Future Investment ! शब्दांकन - प्राचार्य डॉ. सुजित टेटे  जर कोरोना  संपलाच नाही तर ?  जर शाळा २-३ वर्षे उघडल्याच नाही तर ...

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages