प्रेमाचे मृदुगंध दळवळूद्या...! @प्राचार्य डॉ सुजितकुमार टेटे - काव्यलहरी

डॉ.सुजीतकुमार टेटे

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 12, 2020

प्रेमाचे मृदुगंध दळवळूद्या...! @प्राचार्य डॉ सुजितकुमार टेटे

(प्रेम दिवस विशेष लेख ) 
प्रेमाचे मृदुगंध दळवळूद्या...!

@प्राचार्य डॉ सुजितकुमार टेटे

"बागेतूनी व बाजारातूनी 
कुठून तरी त्याने,
गुलाब पुष्पे आणून द्यावीत 
तिजला नियमाने...... !"
प्र. के. अत्रे यांच्या प्रेमाचे गुलकंद या कवितेची आज आठवण झाली. प्रेमाविषयी बोलायला गेले तर मराठी साहित्यात  महान होऊन गेलेल्या कवींनी मानवी हृदयाला पाझर फुटेल  अशा  कवितेची रचना केलेली आहे आणि आज त्या कवितेच्या ओळी हृदयाला स्पर्श करून जातात आणि प्रेमाचे मृदुगंध उधळण्याचा  प्रयत्न करणात. भावनिक आनंद, अगतिक झालेल्या प्रश्नांची उत्तरे , रंगीत स्वप्नाचे स्पष्ट दृश्य आणि हृदयाला धडकण्याची शक्ती देणाऱ्या या कविता कधी कधी विचलित झालेल्या मनाला धीर देण्याचे कार्य सुद्धा करतात. 

आज फेब्रुवारी १४ ची अर्थात व्हॅलेंटाइन्स डेची सगळे लव्ह बर्डस् या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात. खरं तर हा दिवस नुसता मित्र-मैत्रिणींचा नसून आपण ज्याच्यावर निस्सीम प्रेम करता ते प्रेम व्यक्त करण्याचा आहे. मग तो कुणीही असो आईवडील, भाऊबहीण किंवा कुणी व्यक्ती जिला आपण आदर्श मानतो. पण आज याचं स्वरूप नुसतं मित्र-मैत्रिणींसाठी किंवा प्रेमवीरांसाठी सीमित झालं आहे किंवा त्यांनीच ते आरक्षित केलं आहे, असं वाटतं मला वाटते. याविषयी काही तरी लिहण्याची इच्छा झाली. 

प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाईन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. रोम राज्यातून व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास सुरुवात झाली होती. रोममध्ये केलेडियस द्वितीय राजाच्या साम्राज्यात रोमन सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यावर बंदी घातली होती. हा राजा प्रेम म्हणजे निव्वळ टाईमपास आहे, असे मानत होता. त्यामुळे प्रेम करणार्‍यांचाही त्याला राग यायचा. संत व्हॅलेंटाईनने याला विरोध करून काही सैनिकांचा विवाह लावून दिला.

केलेडियसला हे समजल्यानंतर त्याने व्हॅलेंटाईनला तुरुंगात डांबले. तुरुंगात असतानाच व्हॅलेंटाईनचा जीव जेलरच्या मुलीवर आला. प्रेम केल्याची शिक्षा म्हणून 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईनला फाशी देण्यात आली होती. फाशीच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाईनने प्रेयसीला पत्र लिहिले आणि पत्राचा शेवट 'युअर व्हॅलेंटाईन' असा केला. तेव्हापासूनच 14 फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जातो, अशी अख्यायिका आहे.

आजच्या post modern age मध्ये आपण वावरत आहोत. मनुष्याचा जीवनातील  प्रत्येक दिवस मोलाचा असल्यासारखा झालेला दिसतो. तो संधी शोधत बसतो प्रत्येक दिवस केव्हा celebrate करता येणार आणि आपल्या कुटुंबाला तसेच आपल्या सभोवतालच्या प्रत्येक व्यक्तीला आपण आनंदी आहोत हे दाखविण्याच्या त्याचा तो प्रयत्नच असतो असे म्हणायला चुकिचे ठरणार नाही . 
प्रेम दिवसाविषयी बोलायला गेले तर सर्वाना प्रश्न पडतो कि फक्त प्रेमवीरांसाठीच हा दिवस आहे परंतु  दुसऱ्या दृष्टिकोनातून विचार करायला गेले तर  ‘प्रेमदिवस’ साजरा करणं ही चुकीची गोष्ट पण नाही , जसा आपण आपला वाढदिवस साजरा करतो, तसाच हा दिवस साजरा करायला काय हरकत आहे. आपण ज्याच्यावर जिवापाड प्रेम करतो, त्याला अशा खास दिवशी काही भेटवस्तू देणं, त्याला सांगणं की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, हे या गोड नात्याला परत ताजं, टवटवीत केल्या सारखंच नाही का?  आयुष्यात हे असे भाविक, हळवे क्षण खूप काही सांगून जातात. मनात हक्काचा कोपरा करून रुजून बसतात. आपुकीचे वातावरण निर्माण करतात आणि जगण्यास नवी दिशा देतात. 
रोजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या आयुष्यात बऱ्याच जणांना कुणाप्रती प्रेम व्यक्त करायला वेळ मिळत नाही आणि काही जणांना त्याची गरजही वाटत नाही. पण अशा खास दिवसात ते परत व्यक्त करायला, अनुभवायला खरंच खूप मजा वाटते. आयुष्यात renewal झाल्यासारखे वाटते , त्यात प्रेमाचा रंग दिसायला लागतो, अशा खूप साऱ्या कल्पना आपल्या मनात घर करून जातात. या दिवसाविषयी बोलले तर प्रत्येकाचे वेगवेगळे विचार आपल्या समोर येतात.  
याला खरं तर वयाचंही बंधन नसावं, नाही का? कारण आजी-आजोबांनाही अशा खास दिवशी, आपले जुने दिवस न आठवणार तर नवलच. नातं कितीही जुनं झालं तरी, प्रेम नेहमीच टवटवीत, ताजं राहातं किंबहुना ते राहावं. एक आठवण म्हणून आणि कुटुंबासोबत स्नेह साजरा करण्यासाठी आपण Anniversary , Birthday हे सर्व साजरे करतोच ना! मग एक celebration म्हणून प्रेमदिवस सर्व कुटुंबासोबत साजरा केला तर विभक्त होत चाललेल्या कुटुंबातील जवळीकता वाढेलच आणि कुटुंबात नवचैतन्य येणारच असे माझे व्यक्तिगत मत आहे. जिंकण्याच्या गर्दीत स्वत:चं आयुष्य हरवलेल्यांना, मुलांचं संगोपन करण्यात व्यस्त असलेल्या जोडप्यांना, नातवांना सांभाळणाऱ्या आजी-आजोबांना माझ्या व्हॅलेंटाइन्स् डेच्या हार्दिक शुभेच्छा!
याविषयावर बोलले असता प्रत्येक व्यक्तीच्या वेलवेगळ्या प्रतिक्रिया बघायला मिळतात. ‘प्रेम, लग्न, कमिटमेंट या सगळय़ावर माझा फारसा विश्वास नाही असे बोलणारे व्यक्ती सुद्धा आपल्याला बघायला निश्चितच मिळणार. माणूस या क्षणी जसा आहे, तसा तो पुढच्या क्षणीही असेल याची काही गॅरंटी नाही. मग आयुष्यभराच्या प्रेमाची गॅरंटी कोणी घ्यायची?’  असे देखील विचार आपल्याला ऐकायला मिळतातच. 
‘जर प्रेम संपणारच असेल, तर ते करायचंच कशाला?’ नुकताच टीव्हीवर ‘मितवा’ नावाचा मराठी चित्रपट पाहिला, त्यातला हा संवाद. 
‘नात्यांची गरज असावी, पण गरजेपुरतं नातं नसावं.’ 
उपरोक्त ओळीतून आपल्याला कल्पना येते कि आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला अनेक लोक भेटतात त्यातील काहीच चिरकाल संपर्कात असतात आणि काही तर गरजेपुरतीच नाते जपतात आणि पसार होतात. हे प्रत्येकानेच अनुभवलेले अंतिम सत्य म्हणायला चुकीचे ठरणार नाही. "NOTHING IS PERMANENT " म्हणणारे विचारवंत देखील आपल्याला छान असे लेक्टर देऊन समजूत काढताना दिसतात परंतु खरंच गरजेपुरते नाते असावे असे तुम्हाला वाटते का ? माज्या तरी मते नाती जपण्याची कला अंगिकारली पाहिजे. कारण जीवनाच्या शर्यतीत कोणते नाते आपल्याला केव्हा कामी पडेल हे सांगता येत नाही. 
व्हॅलेंटाइन्स डे आपण साजरा करूयाच. मात्र प्रेमही वेगवेगळय़ा प्रकारचं असतं. नाती निरनिराळय़ा घाटाची असतात. कंटाळवाणे जगण्यापेक्षा, ‘डिअर जिन्दगी’ला प्रेमाशिवाय कवटाळण्याची वेळ आली, तर तसं करण्याचीही तयारी असावी! शेवटी हे जीवनच आपला खरा व्हॅलेंटाइन असतं. मग चला प्रेमाचे मृदुगंध दळवळूद्या...! 

No comments:

Post a Comment

ऑनलाइन शिक्षण - Future Investment !

  ऑनलाइन शिक्षण -  Future Investment ! शब्दांकन - प्राचार्य डॉ. सुजित टेटे  जर कोरोना  संपलाच नाही तर ?  जर शाळा २-३ वर्षे उघडल्याच नाही तर ...

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages