प्राचार्य डॉ सुजित टेटे यांना पिएच.डी. पदवी बहाल - काव्यलहरी

डॉ.सुजीतकुमार टेटे

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, January 31, 2020

प्राचार्य डॉ सुजित टेटे यांना पिएच.डी. पदवी बहाल

देवरी :३१ तालुक्यातील लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे प्राचार्य पदावर कार्यरत डॉ सुजित टेटे नुकतीच पीएच. डी. ( डॉक्टरेट ऑफ फिलोसोफी) हि मानाची पदवी देऊन गौरविण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे डॉ सुजित टेटे यांना २०१८ मध्ये डॉक्टरेट ऑफ लिटरेचर (डी. लिट. ) या पदवीने सुद्धा नेपाळ ची राजधानी काठमांडू येथील दिक्षांत समारंभात गौरवण्यात आलेला होते. आदिवासी तसेच  नक्षलग्रस्त भागात सलग ११ वर्षे  शालेय शिक्षण द्वारे सेवा देत असून या भागातील शिक्षणाच्या समस्यांवर आणि आंतरराष्ट्रीय भाषा शिकतांना आणि   शिकविताना येणारे अडथळे व उपाय यावर  शोधप्रबंध सादर केलेला होता.  आदिवासी नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण , नानाविण शैक्षणिक संकल्पना , कृतीयुक्ती शिक्षण प्रणाली , आणि विविध सामाजिक संकल्पनांच्या माध्यमातून शिक्षणाचा दर्जा  उंचावण्याचे कार्य डॉ सुजित टेटे करीत आहेत. पुस्तकी ज्ञानासोबतच विविध सहशालेय उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी विकास करण्याचे कार्य या भागात करीत आहेत. डॉ. सुजित टेटे यांनी इंग्रजी आणि मराठी भाषेत २ पुस्तकाचे लिखाण केलेले आहे त्याच बरोबर आता पर्यन्त ३ शैक्षणिक सामाजिक लघुचित्रपटाची निर्मिती केलेली आहे. याच बरोबर यांनी शाळेत राबविलेल्या उपक्रमाची दखल घेत राष्ट्रीय इनोव्हेटिव्ह टीचर अवॉर्ड २०१९  ने सन्मानित झालेले आहे. डॉ . सुजित टेटे यांचे शिक्षण ग्रामीण भागातून झाले असून त्यांना विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थेचे सदस्यत्व प्राप्त झालेले आहे. विद्यार्थी प्रेमी आणि कर्तव्यदक्ष कामामुळे आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. सदर यशाचे श्रेय डॉ सुजित यांनी आपले कुटुंब, मित्र परिवार , शालेय सहकारी आणि विध्यार्थ्यांना दिलेले आहे.  बहुल मागास भागात असून सुध्या केलेल्या कामगिरीचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.  

No comments:

Post a Comment

ऑनलाइन शिक्षण - Future Investment !

  ऑनलाइन शिक्षण -  Future Investment ! शब्दांकन - प्राचार्य डॉ. सुजित टेटे  जर कोरोना  संपलाच नाही तर ?  जर शाळा २-३ वर्षे उघडल्याच नाही तर ...

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages