नात्यात बांधुनी मला - काव्यलहरी

डॉ.सुजीतकुमार टेटे

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, January 23, 2020

नात्यात बांधुनी मला

नात्यात बांधुनी मला
रडता हसवलीस  तू.....
डोळ्यांत झोप येता
स्वप्नात जागवलिस  तू......

काही शब्द तुझे होते
काही मी दिले
शब्दांच्या या खेळात
नवे अर्थ आले
काही अर्थात माझ्या
भाव आणलीस तू...

ओळख होती नवीच
जुने काही वाटायचे
तुझ्या नसन्याच्या ओळखितही
मी मला भेटायचो
काही माझ्या ओळखि च्या
जाणीवेत आलिस तू....


नसे जरी काही आपल्यात
आपलेच काही असायचे
नसताही भाव नात्यात
भाव मला शोधायचे
काही माझ्या भावाला
प्रेम दिलीस  तू........



रात्र ती संपली नाही
डोळ्यांत मी जागलो
तुझ्या ओढित जायचे
स्वप्नासाठी झोपलो ....
काही माझ्या स्वप्नासाठी
अजूनही जागवलीस तू......

No comments:

Post a Comment

ऑनलाइन शिक्षण - Future Investment !

  ऑनलाइन शिक्षण -  Future Investment ! शब्दांकन - प्राचार्य डॉ. सुजित टेटे  जर कोरोना  संपलाच नाही तर ?  जर शाळा २-३ वर्षे उघडल्याच नाही तर ...

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages