स्वातंत्र दिन विध्यार्थ्यांविना अधुरे वाटणार ?
शब्दांकन - प्राचार्य डॉ. सुजित टेटे
मो - ९४०५२४१००४
देशाला स्वातंत्र मिळाले तेव्हा पासून हे पहिलेच स्वातंत्र दिन ज्यामध्ये प्रत्येक्ष विद्यार्थ्यांचा सहभाग नसणार कारण शाळा बंद आहेत ? बाहेर कोरोना राक्षस आहे त्यामुळे स्वातंत्र दिनी
उत्साहात सकाळी शाळेत जाण्याची तयारी करणारे विध्यार्थी , नीटनेटका गणवेश परिधान करणारे , आपल्या भाषणाची तयारी कर्णाचे विध्यार्थी या सर्व गोष्टी यावर्षी बघायला मिळणार नाही. शाळा देखील हा क्षण पहिल्यांदाच अनुभवणार आहेत. विध्यार्थी आणि स्वातंत्र दिन याचे जवळचे नाते आहे कारण देशभक्तीचे बीजे शाळेतूनच पेरली जातात आणि देशप्रेमाची सवय देखील शालेय जीवनातूनच लागते असे म्हणायला हरकत नाही.
देशातील परिस्थिती बघता या स्वतंत्र दिनी विध्यार्थी स्वातंत्र नाहीत. लॉकडाउनच्या विळख्यातून केव्हा बाहेर भरारी घ्यावी असे विचार कदाचित प्रत्येक विध्यार्थ्यांच्या मनात येत असतीलच. देश स्वातंत्र दिन साजरा करणार परंतु आपण स्वातंत्र नाही का ? असे प्रश्न देशील विध्यार्थी विचारतीलच. तिरंगी ध्वजाला प्रत्येक्षात सलामी मारून भारत माता कि जय असे जयघोष करणारे विध्यार्थी प्रत्येक्षात राष्ट्रध्वजाला बघणारही नाही पण त्यांच्या मनातील राष्ट्रप्रेम कमी होता कामा नये.
शाळा ह्या संस्कार देणारे संस्कार केंद्र आहेत यामध्ये विध्यार्थी घडविले जातात आणि सुजाण नागरिक बनून देशाचे नाव लौकिक करणार व अभिमानाने जीवन जगणार अशी शिकवण दिली जाते परंतु यावेळी हे स्वातंत्र दिन विध्यार्थ्याविना अधुरे नक्कीच वाटणार ?
स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय हे आपल्यातल्या किती जणांना माहीत असते? स्वातंत्र्य हवे असेल तर निर्णयाची जबाबदारीही घ्यावी लागते याचे भान किती जणांना असते? स्वातंत्र्य ही कुणाकडून घेण्याची गोष्ट नाही तर ती मनाची एक अवस्था आहे हे आपल्याला माहीत असते का? आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजांचे आपल्यावरचे नियंत्रण त्या दिवशी अधिकृतपणे संपले. आपण आपली स्वत:ची राज्यघटना तयार केली आणि नागरिकांना काही मूलभूत स्वातंत्र्ये दिली. विचार, अभिव्यक्ती, संचार, धार्मिक आचार अशा अनेक विषयांमध्ये स्वातंत्र्य प्राप्त झाल्याने नागरिकांना आपला विकास साधण्याची संधी निर्माण झाली. दुसऱ्याच्या नियंत्रणातून मुक्ती मिळवणे म्हणजे स्वातंत्र्य असा राजकीय स्वातंत्र्याचा अर्थ आहे. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थच मुळी आपल्याला हवे तसे विचार करण्याचा, बोलण्याचा आणि वागण्याचा हक्क आणि शक्ती असणे असा आहे. दुसऱ्या व्यक्तीच्या किंवा परिस्थितीच्या ताब्यातून किंवा हस्तक्षेपातून मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य.
लहान मुलाची वाढ होताना त्याचा स्वाभाविकपणे स्वतंत्र विचार आणि आचाराच्या दिशेने प्रवास होतो. कुमारवयात मुलांची विचारक्षमता वाढते. अमूर्त संकल्पना समजू लागतात. तसेच याच वयात स्वत:च्या आयुष्यातले काही महत्त्वाचे निर्णय उदा. शिक्षण, करिअर इ. घेण्याची त्यांच्यावर वेळ येते. यातून मुले स्वतंत्रपणे विचार करायला आणि निर्णय करायला लागतात. तसे जमले तर त्याला स्वत:ची ओळख प्राप्त होते, आत्मविश्वास वाढतो आणि जगाला सामोरे जाण्याचे बळ येते. आईवडिलांवर सतत अवलंबून राहण्याची गरज भासत नाही.
निर्णय करणे, त्यावर कार्यवाही करणे याचे स्वातंत्र्य असणे याची दुसरी बाजू म्हणजे योग्य निर्णय करणे, आपल्या जीवनमूल्यांचा विचार करून निर्णय करणे होय. म्हणजेच हे स्वातंत्र्य अर्निबंध नाही, तर जबाबदारीचे आहे. स्वनियंत्रण आणि जबाबदारीची जाणीव यातून नैतिक आणि कायदेशीर बंधने तयार होतात आणि ती स्वीकारलीही जातात. योग्य निर्णय करताना आपल्या परिस्थितीचा विचार करावा लागतो, आपल्या कुटुंबाचा, नातेसंबंधांचा विचार करावा लागतो. म्हणजेच एकीकडे काही बंधने येतात.माझे विचार व्यक्त करण्याचे मला स्वातंत्र्य आहे असे म्हणत सोशल मीडियावर अनेक मते मांडली जातात. त्या वेळेस कधी कधी माहिती तपासून घेणे, भाषेवर ताबा ठेवणे, अफवा न पसरवणे अशा अनेक जबाबदाऱ्या टाळल्या आहेत असे लक्षात येते.
विविध प्रकारची माहिती, मतप्रवाह आज आपल्याला ऐकायला, पाहायला मिळतात. आपल्याला निर्णयस्वातंत्र्य आहे. योग्य, अयोग्य काय हे ठरवण्याचे, विचार करण्याचे स्वातंत्र्य आहे, तशीच विचार करणे ही जबाबदारी आहे. त्या जबाबदारीपासून दूर पळाले की प्रचार प्रसाराला बळी पडण्याची शक्यता वाढते. अतिरेकी विचारसरणीला अनुयायी यातून मिळतात. त्या विचारसरणीसाठी दहशतवादी कारवायांमध्ये सामील होतात. मिळालेल्या स्वातंत्र्याचा असाही उपयोग केला जातो. “माझा मी स्वतंत्र आहे.’ याचा अर्थ मी एकटा आहे असा होत जातो. कौटुंबिक, सामाजिक कोणत्याच बंधनांमध्ये अडकायचे नाही असे मानणारा सगळ्यांपासून दूर जातो आणि त्याला लवकर निराशा येते. तारुण्यातच अतिचिंता, उदासीनता, व्यसनाधीनता असे अनेक मानसिक विकार होतात. कधी कधी आत्महत्याही केली जाते.
स्वातंत्र्याच्या अतिरेकातून उपभोगवाद निर्माण होतो. हवे तसे वागण्याचा मला अधिकार आहे, अशी समजूत होते. यातून नैतिक मूल्ये, कायदेशीर बंधने, समाजाच्या आणि कुटुंबाच्या मर्यादा कशाचेही भान राहत नाही. स्वैराचार वाढतो. गुन्हेगारी आणि समाजविघातक वृत्ती बळावतात. मुक्ती ही बंधनापासून असते, अन्याय अत्याचारापासून असते, गुलामगिरीपासून असते. स्वातंत्र्य हे एक चांगले आयुष्य जगण्यासाठी असते. हे स्वातंत्र्य आपल्या सुदैवाने आपल्याला आज आहे. त्याचा योग्य उपयोग करणे आपल्या हातात आहे.
या सर्व गोष्टीवर फक्त शाळा नियंत्रण आणू शकतात. कारण शाळा आणि शिक्षक राष्ट्र निर्माण करण्यासाठी मोलाचे सहकार्य करत असतात. इतिहासात पहिलांदाच हे स्वातंत्र दिन विध्यार्थ्याविना साजरे होणार आहे आणि यामध्ये कुठलीही कमी पण विध्यार्थ्यांना जाणवणार नाही या कडे समाजाने आणि विशेष करून पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे .
No comments:
Post a Comment