हरवली पाखरे .... ! - काव्यलहरी

डॉ.सुजीतकुमार टेटे

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 19, 2020

हरवली पाखरे .... !

हरवली पाखरे .... !
शब्दांकन - प्राचार्य डॉ सुजितकुमार टेटे


किती शांत झालेत ना आपल्या शाळा ? नेहमी किलबिल असणारी शाळा आज पोरकी झाल्यासारखी दिसतात ना ! शाळेची घंटा सुद्धा आज तिचे महत्व सांगत आहे, कशी वाजणार ? जशी चिमण्यांची चिवचिव तशी या शाळेतील विद्यार्थ्यांची चिवचिव काही दिवसापासून हरवलेली दिसते ना ? शिक्षकाविना विध्यार्थी अधुरे आणि विध्यार्थ्याविना शिक्षक अधुरे !
जगात कोरोना विषाणूचा वाढतही प्रमाण बघता वाढणारा संक्रमण थांबविण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाचे मनस्वी स्वागत आहे. दररोज झालेल्या सवयीमुळे आज शाळा एकदम शांत आणि पोरकी झालेली दिसतात आणि शाळेच्या इवल्याश्या घेत्यातून  पाखरे हरवलेली झाल्यासारखे दिसत आहे. आज खरंच विधार्थी प्रेमी शिक्षकाला विद्यार्थ्यांची आठवण झालीच असेल ना ?

शिक्षक व विद्यार्थ्याचे नाते कसे असावे यावर अनेकदा बोलले जाते. जुन्या पिढीचे लोक जेव्हा या नात्याविषयी बोलतात तेव्हा त्यात सलही असते की आजकाल काही खरे राहिले नाही. पूर्वी शिक्षकाला मुले खूप घाबरायची पण आजकाल घाबरत नाहीत. आमच्या काळी शिक्षक या गल्लीतून आले तर आम्ही दुसर्‍या गल्लीतून जात होतो. यातून हे नाते भीतीवर आधारित असावे असेच त्यांना सुचवायचे असते. दुसरा दृष्टिकोन असा असतो की, शिक्षकाविषयी टोकाचा खूप आदर असला पाहिजे. त्यात हे नाते गुरू व भक्त या पातळीवर जाते. आपल्या पुराणातील सर्व कथा वाचून लक्षात येते की गुरूला काहीच क्रॉस क्वेश्चनिंग नाही... फक्त ओबे द ऑर्डर. तोच शिष्य महान मानला जाई की जो गुरूचे नम्रतेने चिकित्सा न करता ऐकत असे. त्यामुळे एकूणच आपल्या परंपरेत शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते हे दोन टोकावर आहे. एका बाजूला नाते भीतीवर आधारित असावे व दुसरीकडे ते नाते टोकाच्या आदरावर आधारित असावे. अर्थात आदरातही पुन्हा सूक्ष्म भीतीच दडलेली असते. तेव्हा एकूणच आपली परंपरा शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते समान ठेवायला तयार नाही.

हे नाते समान पातळीवर असले पाहिजे हे ते आग्रहाने सांगतात. ते म्हणतात की, शिक्षकाच्या मनात इगो नसावा व विद्यार्थ्याच्या मनात न्यूनगंड नसावा. त्यातूनच योग्य नाते उदयाला येऊ शकेल. शिक्षकाच्या शारीरिक  हालचाली किंवा विचार, नजर, बोलणे या कशातूनच विद्यार्थ्यात भीती संक्रमित होता कामा नये. जर शिक्षकातील ही अहंगडाची भावना जर विद्यार्थ्यात उतरली तर विद्यार्थी त्याच्या भावी आयुष्यात एकतर प्रचंड उद्धट होऊ शकतो किंवा गुलाम मानसिकतेचा होऊ शकतो. शिक्षकाच्या वागणूकीचे नातेसंबंधातील चुकीच्या दृष्टीकोनाचे इतके गंभीर परिणाम होऊ शकतात. शिक्षकाच्या मनातही भीती असतेच, पण ती त्याने कधीही मुलांमध्ये नात्यात संक्रमित करता कामा नये. दोन मित्र ज्याप्रमाणे एकमेकांशी बोलतात अगदी तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते असले पाहिजे. कोणतीही भावनात्मकता न आणता नम्रतेने शिक्षकाने मुलांशी बोलले पाहिजे. पण भावनात्मकता हाही ते अडसरच मानतात. त्या संभाषणात फक्त प्रामाणिकता असावी आणि नम्रता असावी.

नातेसंबंधात आपण आरशासारखे बघून स्वत:ला तपासायचे असते. या अर्थाने शिक्षकाला हे नातेसंबंध महत्त्वाचे ठरतील. शिक्षकाला मुलांशी तो कसे वागतो यातून त्याला स्वत: विषयीचेच ज्ञान होईल. इतरत्र नम्रतेने वागणारा तो मुलांशी मात्र आक्रमक संतापी वागत असेल तर स्वत: मधील काहीशा हुकूमशाहीवृत्तीचे दर्शन त्याला होईल. आपण मुख्याध्यापकाशी कसे नम्रतेने वागतो व मुलांशी कसे आढ्यतेने वागतो यातील फरक त्याला हळूहळू लक्षात येत जाईल. या जाणिवेने त्याच्यात बदल होत जाईल. निसर्गाशी नाते शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे असले पाहिजे. पृथ्वीच्या सौंदर्याशी तुमचे नाते असले पाहिजे अन्यथा तुम्ही समोरच्या व्यक्तीशी योग्य प्रकारचे नाते निकोप ठेवू शकणार नाही. या दोन्हीतील सहसंबंध आपल्या लवकर लक्षात येणार नाही पण तो अतिशय सूक्ष्म पातळीवर आहे.

 शिक्षकांच्या विचारातील सकारात्मकता, आशावाद, मुलांना जगण्याचे बळ देतो. भविष्यात येणाऱ्या संकटांवर मात करायची असेल तर शिक्षकांना मुळात स्वतःला घडविण्याची, उत्तुंगतेची आस असली पाहिजे. जीवनाकडे बघण्याचा दुर्दम्य अशावाद असला पाहिजे. कठोर वास्तवाला सामोरे जाण्याची जिद्द हवी. शिक्षकांसाठी रोजचा दिवस हा शिक्षक दिन असला पाहिजे. तरच चांगले विद्यार्थी घडविले जाऊ शकतात.
 विद्यार्जन करणारे विद्यार्थी आणि त्यांना या प्रक्रियेत मदत करणारे शिक्षक यांचे बंध- अनुबंध चैतन्यपूर्ण स्वरुपाचे हवेत. शिक्षकाला मातीची भांडी घडविणाऱ्या कलाकाराची भूमिका निभावताना विद्यार्थ्यांवर सुसंस्कार, नीतिमूल्य, सकारात्मक जीवनदृष्टी यांची सुंदर नक्षी उमटवायची आहे. त्यातूनच उद्याचे आदर्श नागरिक घडणार असून देशाचे भवितव्य ठरविणार आहेत. प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्र तेज, बुद्धी आणि वृत्ती जपणारा असतो. त्याचा कल शिक्षकाने समजावून घेतला पाहिजे. शिक्षकाने विद्यार्थ्यांमधील प्रकट अवगुण आणि सुप्त गुण हेरून त्याच्या व्यक्तीमत्वाला आकार द्यायचा असतो.

विद्यार्थ्यांबद्दल शिक्षकांच्या मनात अनेक तक्रारी असतात. मुलं कच्ची आहेत, ती अस्वच्छ राहतात, गैरहजर रहातात. गृहपाठ करीत नाहीत, दंगा करतात, अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात वगैरे वगैरे. विद्यार्थ्यांबाबतचा हा नकारात्मक दृष्टिकोन कमी करण्यासाठी शिक्षकांनी आत्मपरिक्षण करणे जरुरीचे आहे. समस्या असणारच, मात्र, कौशल्याने त्यांच्या मुळाशी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांच्यातील चांगल्या गुणांना प्रोत्साहन देणे, त्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणे, प्रकल्प राबविणे आवश्यक आहे.
 शिक्षण प्रक्रियेत शिक्षक व विद्यार्थी हे दोन महत्त्वपूर्ण घटक असून त्यांचा एकमेकांवर सतत परिणाम होत असतो. सध्याच्या माहितीच्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांवरील जबाबदारी फार मोठी आहे. विद्यार्थी पालक व शिक्षक यांनी एकत्र येऊन विचार करण्याची वेळ आली आहे कारण उद्याचा समाज हा सतत शिकत राहणार आहे. यासाठी शिक्षकांची कार्यत्परता खूप महत्वाची आहे. शिक्षकांच्या छोट्य़ा-मोठ्या कृतीतून हे संस्कार जोपासण्यासाठी शिक्षक मातृहृदयी हवा. यामुळे मुलांचे दडपण कमी होते व आनंददायी शिक्षण होते. वर्गातील वातावरण प्रेरक होते.

शिक्षकाने वाचनप्रिय पाहिजे. स्वतःचा ग्रंथसंग्रह असणे आवश्यक आहे. आपले ज्ञान अद्ययावत असणे आवश्यक आहे. त्यामुळे कामात निर्माण होणारे कोणतेही प्रश्न हातळण्याची सूत्रे आपल्याला उपलब्ध होतात. शिक्षकाने नेहमी चिंतनशील असावे. कोणत्याही समस्येची उकल होण्यासाठी सखोल चिंतनाची आवश्यकता असते. शिक्षकाने चर्चा करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांच्या गैरवर्तनाच्या, बेशिस्तीच्या समस्या एकट्याने सोडविण्यापेक्षा सांघिक पद्धतीने सोडवाव्यात. इतरांची मने जाणून घेण्यासाठी समस्या हाताळण्याचे नवे तंत्र हाती येऊ शकते. आपल्या समस्या, अडचणी यांच्या नोंदी ठेवण्याची सवय शिक्षकांमध्ये आसायला हवी. आपल्या लेखनातून, पथनाट्यातून, एकांकिका, कथा, गीते, कविता, लेख यातून शिक्षक आपल्या समस्या मांडू शकतात. यातून त्यांच्या विचारांची तीव्रता इतरांना कळते. त्यावर चर्चा होते आणि समस्यांचा चक्रव्यूहातून मार्ग शोधला जातो.

आजचे युग हे संगणकाचे युग आहे. कुठल्याही नव्या परिवर्तनाच्या आणि संक्रमणामागच्या शक्तीचा उगम प्रभावी शिक्षण हे माहिती व तंत्राधिष्ठीत आहे. आपल्या शाळांमधून परिक्षार्थी तयार करण्यापेक्षा खरे ज्ञानाकांक्षी, विवेकनिष्ठ प्रयोगवीर तयार होण्यासाठी प्रत्येक शाळा ही साक्षात प्रयोगशाळा झाली पाहिजे. शिक्षकांनी आपल्या वाट्याला आलेले काम कुशलतेने, आनंदीवृत्तीने, बिनचुकपणे, वेळेत आणि नियमांच्या आधीन राहून करायला हवे. बुद्धीवादी शक्ती या भूमिकेतून प्रत्येक शिक्षकाने नवनवीन अध्यापन तंत्राचा अवलंब करून विषयात सहजता आणावी. त्या त्या विषयाचा प्रत्यक्ष जीवनाशी असणारा संबंध स्पष्ट करावा आणि शिक्षण हे खऱ्या अर्थाने जीवन शिक्षण बनावे.

मुलांमध्ये सदैव रमणारे साने गुरूजी म्हणतात त्याप्रमाणे जो मुलांना पावसात भिजायला शिकवतो, आकाशाशी दोस्ती करायला शिकवितो तो खरा शिक्षक. नाही तर विद्यार्थ्यांना गणिताची सूत्रे येतात पण त्या मागची तर्कसंगती समजत नाही. मग आयुष्यात तो विसंगतीचाच पाठपुरावा करतो. विद्यार्थी कविता शिकतात पण त्यातील सौंदर्य त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. विज्ञानाचे प्रयोग करतात पण त्यामागील विज्ञाननिष्ठा रुजत नाही. म्हणून शिक्षक हा मुळातच संवेदनशील हवा. शिक्षकांनी आपल्या समाजातील प्रतिमेला जडा जाणार नाही, आपल्या सुखदुखाचा, मानअपमानाचा विद्येच्या प्रांगणात प्रतिबिंबित होणार नाही याची दक्षता घेतली तरच ज्ञानदानाचे पवित्र कार्य तेवढ्याच तन्मतेने, उत्कटतेने पार पडेल.विद्यार्थ्यांमधील कच्चे दुवे दोघांनी मिळून शोधले पाहिजेत आणि चर्चेतून ते दूर करण्याचा प्रय़त्न केला पाहिजे. पालक आणि शिक्षकांच्या समन्वयातूनच उद्याची पिढी आणि राष्ट्राचे आधारस्तंभ घडणार आहेत.

या सर्व गोष्टींमध्ये रोज रमणाऱ्या शिक्षकाला आज एकटे एकटे झाल्यासारखे वाटते. कोरोना संक्रमणाच्या जागतिक महामारीतुन जग आणि नवीन पिठी मुक्त व्हावी आणि नवीन दिशा आणि दृष्टीसह आपल्या जीवनाच्या नित्यक्रम सामील  होऊन आम्हा शिक्षकाची हरवलेली पाखरे आम्हाला पुन्हा मिळवून द्यावीं आणि पुन्हा या शाळा बडबड गीतांनी , कवितांनी , सुविचार , बोध कथांनी , खेळाच्या गमती जनतीनी भरून यावीत हिच सकारात्मक अपेक्षा.  

No comments:

Post a Comment

ऑनलाइन शिक्षण - Future Investment !

  ऑनलाइन शिक्षण -  Future Investment ! शब्दांकन - प्राचार्य डॉ. सुजित टेटे  जर कोरोना  संपलाच नाही तर ?  जर शाळा २-३ वर्षे उघडल्याच नाही तर ...

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages