लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी।
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी।
धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी।
एवढ्या जगात माय मानतो मराठी।।
२७ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक मराठी भाषा दिवस’, मराठी भाषा दिन, ‘मराठी भाषा गौरव दिन’ अशा अनेक नावाने साजरा केला जातो. मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपिठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिना निमित्ताने ‘मराठी भाषा दिन’ साजरा करण्याची सुरुवात करण्यात आली. कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान खरचं अवर्णनीय असून आपण आणि भविष्यातील पीढीने मराठीचा वारसा पुढे चालवावा म्हणूनच ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा करण्याची प्रथा सुरू करण्यात आली. याचे महत्त्व आपण पुढे पाहू यात.
कुसुमाग्रज यांच्या कार्याची महती… पुणे येथे १९१२ साली जन्मलेल्या वि. वा. शिरवाडकर यांनी लहानपणापासून लिहण्याची आवड होती. त्यांनी कोवळ्या वयातच कविता लिहण्यास सुरूवात केली. पुढे कथा, कादंबरी, नाटक, ललित वाड्यमयातील नावाजलेलेली साहित्य रचना त्यांच्या लिखानातून अवतरत राहिली. त्यांच्या अनोख्या साहित्यासाठी १९७४ साली नटसम्राट या नाटकासाठी ‘साहित्य अकादमीचा पुरस्कार’ मिळाला. तसेच १९८७ साली साहित्यातील सर्वोच्च असा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ आणि भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरवीत करण्यात केले.
२७ फेब्रुवारी या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात, देशभरात आणि जगभरात जिथे मराठी माणसे वास्तव्यास आहेत तेथे मराठी राजभाष दिन साजरा केला जातो. या दरम्यान विविध प्रकारचे मराठी नाटके, चित्रपट, शास्त्रीय संगीत, काव्य संमेलन, निबंध, वक्तृत्व स्पर्धा आणि मराठी भाषेला उत्तम दिशा देण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी आपलीच… दरम्यान आज आपण आपल्या भाषेचा म्हणजेच आपल्या मायबोलीचा त्याग करून इंग्रजी भाषेचा अवलंब करीत आहोत. इंग्रजी ही काळाची गरज आहे, नक्कीच, याबद्दल दुमत नाही; परंतु, त्यासाठी आपण मराठीची कास सोडावी, हे मनाला पटणारे नाही. आज आपण आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिक्षणासाठी पाठवतो, मध्ये मराठी भाषा कशी अवघड आहे आणि काना, मात्रा, उकार आणि वेलांटीने आम्ही कसे हैराण झालो आहोत, अशा आशयाचे विद्यार्थ्यांचे व्हिडीओ व्हॉट्स अपवर व्हायरल करण्यात आले होते. मुलांना मराठीचे ज्ञान योग्य देण्याऐवजी आपण ते व्हिडीओ एकमेकांना पाठवून मजा घेत होतो.
अशाप्रकारे मराठी भाषा संवर्धन होणार नाही तरुण मुलांना इंग्रजीसोबत मराठी भाषेचे ज्ञान द्या, मुलांना मराठी शाळेत पाठवा, जर इंग्रजी शाळेत गेला तर आपल्या विद्यार्थ्याची दुसरी भाषा मराठी असावी हा कटाक्ष तुम्ही तुमचा ठेवा. तुमच्य मुलांना महाराष्ट्राचा इतिहास, मराठीचा इतिहास, आपल्या भाषेतील साहित्य वाचायला प्रवृत्त करा, हे करताना तुम्ही ते पहिले करीत आहात का, हे पहा. लहान मुले आपलेच अनुकरण करीत आहात म्हणून पहिले स्वतः करा नंतर दुस-यांमध्ये बदल घडवायला जा. म्हणूनच सुरुवात स्वतःच्या घरातून करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बदल एका रात्रीत घडणार नाही म्हणून आपले प्रयत्न सुरूच ठेवा. जय मराठी, जय महाराष्ट्र!
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टीळा,
हिच्या संगाने जागल्या, द-याखो-यातील शिळा।
मराठी भाषा दिवस , भाषाभ्रम आणि पडणारा प्रश्न "खरंच मराठीचा अभिमान वाटतो का ? "
कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा होऊ लागला त्याला आता बरीच वष्रे झाली. वर्षांतून एकदा मराठी भाषा दिवस साजरा करून आपण जगाला हे सांगत असतो की, ‘मराठीचा आम्हाला विसर पडला आहे. हिचे पांग आम्ही फेडू शकत नाही. एक जिवंत भाषा म्हणून तिच्या संवर्धनाचा, आधुनिकीकरणाचा वसा आम्ही टाकून दिला आहे. भाषा दिन साजरा करणे, केंद्राकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळवणे या प्रतीकात्मक असल्या तरी आमच्या आवाक्यातील गोष्टी आहेत. इंग्रजी भाषेप्रमाणे सर्व प्रकारचे व्यवहार मराठीतून करणे, त्यासाठी मराठी माध्यमातूनच शिकणे-शिकवणे हे आम्हाला जमणार नाही. आम्हाला स्वत:ची प्रगती करायची आहे; स्वभाषेची नव्हे. अख्ख्या जगाने समृद्ध केलेली इंग्रजी हीच आमच्यासाठी ज्ञानभाषा व उद्याची लोकभाषा आहे.’ अर्थात, हे आपण बोलून दाखवत नाही. कारण तसे करणे औचित्याला धरून नाही. त्यापेक्षा एखादा दिवस मराठीच्या (न करायच्या) विकासासाठी एकमेकांना शुभेच्छा देणे हे आपल्या उत्सवप्रियतेला व दांभिकपणाला शोभणारे आहे. असे माझे वयक्तिक मत आहे.
मराठी भाषेला काहीही झालेले नाही आणि भविष्यात काही होणार नाही असा एक भ्रम मराठी भाषा दिनाला हमखास पसरवला जातो, तो अधिक धोकादायक आहे. हे खरे आहे की, मराठी भाषेचे जे काही झाले आहे त्याला मराठी भाषा जबाबदार नाही तर मराठी भाषक जबाबदार आहेत. भाषा मरत नाहीत; भाषक मरतात. गेल्या दोन-तीन दशकांत हजारो-लाखो मराठी ‘भाषक’ मेले, म्हणजे त्यांनी मराठीचा त्याग केला. आपल्यापैकी अनेकांना महत्त्वाच्या व्यवहार क्षेत्रांत मराठी भाषा वापरण्याची लाज वाटते.
मराठीसंबंधी असे कटू पण स्पष्ट बोलणे अनेकांना आवडणार नाही. पण ते काम कोणीतरी केलेच पाहिजे. अन्यथा, इतिहास आपल्याला माफ करणार नाही. मराठीबाबतचे भ्रम जोपासत आपण येणाऱ्या पिढय़ांचे आणि विशेषत: तळागाळातील समाजाचे अपरिमित नुकसान करीत आहोत. यापुढे ज्यांना मराठीतून आपली आपली उपजीविका साधायची आहे त्यांना मराठीचे येत्या ३०-४० वर्षांतले चित्र काय असणार हे स्पष्टपणे सांगायला हवे. स्वभाषेच्या वापराचा अलिखित करार आम्ही व्यक्तिगत स्वार्थासाठी कधीच मोडला आहे. यापुढे जे लोक त्याचे पालन करतील त्यांना पश्चात्ताप करावा लागेल. रांगेचा फायदा सर्वाना होतो. पण कधी? सर्वानी रांगेत उभे राहण्याच्या नियमाचे पालन केले तर. भाषेचेही तसेच आहे. भाषेचा विकास ही सर्वानी मिळून सातत्याने करायची गोष्ट आहे. चार-दोन लोकांनी, कधीतरी करायची गोष्ट नाही.
इंग्रजीतर भाषेचे वर्चस्व असलेल्या देशांत जाऊन आपण तेथील भाषा निमूटपणे शिकायला तयार होतो. कारण आपल्याला आपल्या भौतिक प्रगतीशी देणेघेणे असते. अशा स्थितीत जिच्याविषयी आपणास आंतरिक प्रेम असते त्या आपल्या निजभाषेला आपण ऑप्सन वर ठेवून परकीय पण प्रगतीच्या भाषेला आपण ‘प्रथम पसंती ’वर आणतो. स्वभाषेविषयीचे आपले प्रेम मरत नाही ते फक्त भावनिक, प्रतीकात्मक पातळीवर राहते.
यावरून खरंच एक प्रश्न पडतो "खरंच मराठीचा अभिमान वाटतो का ? "

No comments:
Post a Comment