"थकान शाम को अपना घर मांगती हैं,
और जिंदगी रोज नया सफर मांगती हैं।
तो चलो सुरु करो जिंदगी का नया सफर..."
नवी पहाट, नवी स्वप्ने, नवे संघर्ष, नवे समस्या , नवी अपेक्षा आणि नवी दिशा आणि प्रातःकाळी न चुकता आपली हजेरी लावणारी सूर्याची किरणे नव्या दिवसाची नेहमीच आठवण करून देतात.
आज वाटलं निवांत झोपून राहावं , जीवनातील एक दिवस असचं जगावं, पण मन पटलावर लुकलुकणारे चांदणे एक अकथित सत्य सांगत होते कि "उठ खूप झाले आता, नवीन संघर्ष आणि नवी दिशा तुझी वाट बघत आहे" आणि यातूनच मिळालेली सकारात्मक ऊर्जा आणि काही तरी हटके करण्याचा उत्साह उरात संचारला.
संवेदनशीलतेच्या आड प्रामुख्याने येणारी गोष्ट म्हणजे संघर्ष. मानसिक पातळीवरील कोणताही संघर्ष हा ऊर्जेचा अपव्यय तर करतोच, शिवाय तो माणसाला असंवेदनशील बनवतो. संघर्षग्रस्त मन हे दुसऱ्यांच्या बाबतीत नेहमीच असंवेदनशील असते.
आपण जगत असलेल्या आपल्या रोजच्या जीवनाकडे जर आपण एक दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला आढळून येईल की, आपले जीवन हे अत्यंत संघर्षमय आहे. अगदी जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपल्या जीवनात सातत्याने काही ना काही झगडा सुरू असतो. घरात असताना घरातील व्यक्तींशी संघर्ष, घराबाहेर पडल्यावर बाहेरच्या व्यक्तींशी संघर्ष, ऑफिसमध्ये गेल्यावर तेथे संघर्ष. मनुष्य जेथे जाईल तेथे संघर्ष निर्माण करत असतो. हा संघर्ष केवळ व्यक्तिगत पातळीवर न राहता तो सामूहिक रूपदेखील धारण करतो. दोन कुटुंबातील संघर्ष, दोन जातींमधील संघर्ष, दोन धर्मामधला संघर्ष, दोन देशांमधला संघर्ष. खरेच संघर्षांशिवाय माणूस जगूच शकत नाही का? कारण कोणताही संघर्ष माणसाच्या जीवनात दु:ख निर्माण करत असतो, त्याला असुरक्षित बनवत असतो, त्याची झीज घडवून आणत असतो.
तसे पाहिले तर जगण्यासाठी प्रत्येक जीव हा धडपडत असतोच. किंबहुना ही धडपड हेच त्याचे जीवन असते. परंतु या धडपडीतून कलह हा फक्त मानवी जीवनातच निर्माण होताना दिसतो. सामूहिक स्तरावर या कलहाचे रूपांतर युद्धात होते. मानवी इतिहास हा विविध प्रकारच्या युद्धांच्या तपशिलांनी खच्चून भरलेला आहे. युद्ध, त्यातून घडणारा विनाश व होणारी दु:खनिर्मिती वारंवार अनुभवूनसुद्धा मानव अजून शांततेत जगण्यास शिकलेला दिसत नाही. मानवाने विज्ञानाची कास धरून आपले जीवन अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला असला तरी ते तो पूर्णपणे संघर्षमुक्त करू शकलेला नाही. आणि कोणत्याही संघर्षांशिवाय जगणे हीच तर खरी जगण्याची कला आहे. विशिष्ट प्रकारे श्वास घेणे, विशिष्ट पद्धतींचे अवलंबन करणे म्हणजे जगण्याची कला नव्हे. तसे करणे म्हणजे अमर्याद संभावना असलेल्या मानवी जीवनाला अत्यंत संकुचित करून टाकणे होय. आणि या संभावना तोपर्यंत उन्मीलित होऊ शकत नाहीत, जोपर्यंत माणसाचे जीवन पूर्णपणे संघर्षमुक्त होत नाही.
आपल्या जीवनात संघर्ष का आहे, असा प्रश्न तरी आपण स्वत:ला कधी विचारला आहे का? की हा संघर्ष आपण गृहीतच धरला आहे? जगण्यासाठी झगडणे हे आपल्या इतके अंगवळणी तर पडलेले नाही ना, की त्यामुळे असा प्रश्नच आपल्या मनात उद्भवत नाही? संघर्षांमुळे जीवनास एक प्रकारची धार येते, संघर्षांशिवाय जीवन अगदीच आळसी व सुस्त होते, अशी तर आपल्या मनाची धारणा झालेली नाहीये ना? माणसाच्या जीवनातील संघर्ष म्हणजे फक्त माणूस व त्याच्या भोवतालची परिस्थिती यांच्यातीलच संघर्ष नव्हे, तर माणसाच्या आत, त्याच्या मनातदेखील सातत्याने संघर्ष चाललेला असतो. परस्परविरोधी विचार, परस्परविरोधी भावना व त्यातून निर्माण होणारा विसंवाद हे सर्व मानवाच्या आंतरिक संघर्षांचेच दुवे आहेत. हा आंतरिक संघर्षच तर बाहेर प्रक्षेपित होत नाहीये ना? माणूस अंतर्बाह्य इतका संघर्षमय का आहे?
या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी आपल्याला स्वत:च्या जीवनाकडे बघणे आवश्यक आहे. बाह्यत: आपण इतरांपेक्षा कितीही वेगळे वाटत असलो तरी आंतरिकदृष्टय़ा आपण वेगळे आहोत का? काय आहे आपल्या आत जे इतरांपेक्षा वेगळे आहे? भीती, ती तर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील माणसाच्या मनात असते. कशाची भीती, हे तपशील वेगवेगळे असले तरी भीतीची प्रत्यक्ष भावना ही कोणत्याही मानवात सारखीच असते. त्याचप्रमाणे माझ्या आत मला जाणवणारा क्रोध हा- तपशील सोडला तर- इतर कोणत्याही माणसास जाणवणाऱ्या क्रोधासारखाच असतो. मानसशास्त्रीय पातळीवर माझ्या आत जे-जे काही आहे, ते ते सर्व इतर कोणत्याही माणसाच्या आतदेखील आहे. भौतिक पातळीवर मी इतरांपेक्षा कितीही वेगळा असलो तरी मानसशास्त्रीय पातळीवर मी इतरांसारखाच आहे. हे विधान स्वीकारण्यास कितीही अवघड वाटले तरी ते मानवी जीवनाचे एक वास्तव आहे. असे असूनही मी स्वत:ला इतरांपेक्षा वेगळे का समजत असतो?
एखादा माणूस मानसशास्त्रीयदृष्टय़ा स्वत:ला इतरांपेक्षा इतका वेगळा का समजत असतो? भौतिक पातळीवर स्वत:ला इतरांपेक्षा वेगळे समजण्याची सवय झाल्यामुळे तर नव्हे? त्याला दिल्या गेलेल्या शिक्षणामुळे तर नव्हे? इतरांशी तुलना करून, गुणक्रमांक देऊन अगदी बालपणापासूनच माणसाच्या मनावर तू वेगळा आहेस, इतरांपेक्षा तू अधिक सरस बनले पाहिजेस असे ठसवले जाते. अशा प्रकारे संघर्षांच्या बीजांना अगदी बालपणापासूनच खतपाणी दिले जाते. असा घडविला गेलेला माणूस जगात संघर्षच घडवून आणेल. मग माणसामाणसातील संघर्ष टाळायचा असेल तर प्रत्येकाने स्वत:ला इतरांपेक्षा वेगळे समजणे सोडून दिले पाहिजे का?
जगण्याची कला ही कोणत्याही विशिष्ट पद्धतीने अथवा प्रणाली वापरून मिळवता येत नाही. ती सर्जनात्मक असल्याने कोणतीही पुनरावृत्ती, सवय अथवा यांत्रिक कृती तिच्याप्रत पोहोचू शकत नाही. तिच्यासाठी आवश्यक असलेली संवेदनशीलता व तरलता असली, की तिचे स्वाभाविकरीत्या अवतरण होते. ही संवेदनशीलता व तरलता मिळवता येत नाही तर तिच्या आड येणाऱ्या गोष्टी दूर झाल्या, की ती आपोआप वृिद्धगत होते. संवेदनशीलतेच्या आड प्रामुख्याने येणारी गोष्ट म्हणजे संघर्ष. मानसिक पातळीवरील कोणताही संघर्ष हा ऊर्जेचा अपव्यय तर करतोच, शिवाय तो माणसाला असंवेदनशील बनवतो. संघर्षग्रस्त मन हे दुसऱ्यांच्या बाबतीत नेहमीच असंवेदनशील असते. संघर्षांप्रमाणेच भय, क्रोध, मानसिक दुखापत, सुखाचा पाठपुरावा व दु:खापासून पलायन तसेच विचाराने निर्माण केलेले मानवी चेतनेतील अन्य घटक हे संवेदनशीलतेच्या आड येत असतात.
प्रसिध्द लेखिका सुमा वर्गिस यांच्या मते “Responsibilities and duties decrease our fun of life, so live your life without artificial manner.”
अर्थात जवाबदारी आणि कर्तव्य आपल्या जीवनाचा आनंद कमी करत असतात त्यामुळे कृत्रिम आनंद न शोधता नैसर्गिक आनंद आत्मसात केले तर निश्चितच जीवन जगण्यात उत्साह निर्माण होणार. जीवनात आलेल्या प्रत्येक संघर्षावर मात करून आपल्या जीवनाची प्रत्येक नवी पहाट जगण्यातच खरा आनंद आहे असे मला वाटते.

No comments:
Post a Comment