सांगना का असे घडावे? @प्राचार्य, डॉ. सुजितकुमार टेटे - काव्यलहरी

डॉ.सुजीतकुमार टेटे

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, December 4, 2019

सांगना का असे घडावे? @प्राचार्य, डॉ. सुजितकुमार टेटे

सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे

मी पाहता नभी मेघही सरावे
मेघाळलेल्या नभी क्षणात चांदणे खुलावे
सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे ॥

दिवसास माझे चित्त नसावे
रात्री स्वप्नांतही तूच दिसावे
सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे ॥

सर्वच चेहऱ्यांत तुलाच पाहावे
तरी पुन्हा तुलाच स्मरावे
सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे॥

यातनांनी मनीचे रान भरावे
आसवांनी उरीचे बंध तुटावे
सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे॥

विरहात तुझ्या स्तब्ध रहावे
फक्त हृदयस्पर्शी अपेक्षा करावे
सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे॥

@प्राचार्य, डॉ. सुजितकुमार टेटे

No comments:

Post a Comment

ऑनलाइन शिक्षण - Future Investment !

  ऑनलाइन शिक्षण -  Future Investment ! शब्दांकन - प्राचार्य डॉ. सुजित टेटे  जर कोरोना  संपलाच नाही तर ?  जर शाळा २-३ वर्षे उघडल्याच नाही तर ...

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages