शब्दांकन: प्राचार्य डॉ. सुजित एच. टेटे
प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षेत्रात यश मिळविण्याची अभिलाषा मनात बाळगून असते. परंतु असे यश मिळविण्यास आवश्यक असलेली इच्छाशक्ती आणि कुवत किंवा पात्रता तिच्यात सुप्त स्वरूपात आहे याविषयी ती अनभिज्ञ असेल, तर ती जीवनामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही. म्हणून अशी सुप्त शक्ती ओळखणे आणि तिचा विकास करणे, हा यशस्वी होण्याचा सर्वात महत्त्वाचा नियम आहे.
जीवनातले आपले इप्सित काहीही असो; ते साध्य करण्यासाठी प्रथमतः आपल्यातील कुवत व तिच्या मर्यादा जाणून घेणे अतिशय आवश्यक असते. अशी जाणीव म्हणजे असमर्थता नव्हे, याचेही भान ठेवले पाहिजे; कारण प्रत्येक व्यक्तीत अंगभूत शक्ती असतात. त्यांचे स्वरूप व मर्यादा समजून घेतल्या की यशोमार्गावरील ते पहिले पाऊल ठरते.
जीवनातले आपले इप्सित काहीही असो; ते साध्य करण्यासाठी प्रथमतः आपल्यातील कुवत व तिच्या मर्यादा जाणून घेणे अतिशय आवश्यक असते. अशी जाणीव म्हणजे असमर्थता नव्हे, याचेही भान ठेवले पाहिजे; कारण प्रत्येक व्यक्तीत अंगभूत शक्ती असतात. आपली शक्ती ओळखून तिचे योग्यवेळी उपयोग करून आपल्या ध्येयाकडे वाटचाल सतत तेवत ठेवली पाहिजे. ध्येय वेढे बनल्याशिवाय आपल्यातील शक्तीची जाणीव हॊत नसते त्यामुळे ध्येय वेढेपणा आपल्याला दिशा व दृष्टी दाखविण्यास महत्वाची भूमिका बजावत असते.
काही व्यक्तींना जीवनात संपत्ती, सत्ता, प्रतिष्ठा सहज सुलभतेने प्राप्त होतात. त्या प्राप्त होण्यासाठी त्यांच्या मनात इच्छाही निर्माण झालेली नसते किंवा त्या दिशेने त्यांनी प्रयत्नही केलेले नसतात. पण असे सहज सुलभतेने मिळालेले यश क्षणभंगुर होण्याचा धोका असतो. ते यश पचविण्यासाठी आणि त्याचा योग्य उपयोग करण्यासाठी मनाची आणि बुद्धीची तयारी झालेली नसल्यास असे यश हातातून निसटून जाऊ शकते. म्हणून अंतर्मनातील सुप्त शक्ती जाणून घेऊन कार्यरत झाल्यास यश मिळतेच; पण त्याचबरोबर ते चिरस्थायी होते. अशा यशस्वी माणसाचे जीवनमान तर उंचावतेच; पण समाजात त्याला प्रतिष्ठाही मिळते. केव्हा केव्हा असे प्रयत्न कंटाळवाणे किंवा क्षुद्रही वाटू शकतात. पण तरीही ते करत राहण्यातच यशाचे रहस्य दडलेले असते. असे प्रयत्न सातत्याने करत रहाण्यानेच व्यक्तीची त्याच्या कामावरील निष्ठा आणि ते करण्याची पात्रता सिद्ध होत असते. ही सिद्धीच तिला आत्मविश्वासही देत असते. माणसाला स्वतःविषयी असा आत्मविश्वास वाटतो, तेव्हा इतरांनाही ती व्यक्ती विश्वासार्ह वाटू लागते. यश हे क्षणभंगुर ठरू नये याकडे विशेष लक्ष देणे तेवढेच महत्वाचे आहे.
जे काम आपण स्वीकारलेले असते, त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे; त्यासाठी आपली सर्व मानसिक, शारीरिक व बौद्धिकशक्ती पणाला लावून ते काम निष्ठेने करण्यातच सूज्ञपणा असतो व त्यातच यशाची ग्वाहीही असते. अनेकदा माणसे निराश होतात. पण अशी निराशा त्यांना दुर्बल करत असते व त्या प्रमाणात ती यशापासून दूर जात असतात. तेव्हा अशा निराशेवर मात करून नव्या उमेदीने अधिक चांगल्या गोष्टी करण्याचा निश्चय करून प्रत्यक्ष कृती करण्यास प्रवृत्त झाल्यास त्याचे योग्य ते फळ मिळतेच मिळते. परंतु खुपदा फळाची अपेक्षा न करता कार्य करत राहावे अशे देखील अनुभवयास मिळते. या परिस्थितीवर मात करून आपली वाट तयार करणे हे नक्की आपल्या हातात असते.
स्वतःची नीट ओळख करून घेणे, स्वतःच्या सुप्त शक्तीचा योग्य वापर करणे, स्वतःविषयी चांगला व सकारात्मक विचार करणे आणि कष्ट करण्याची तयारी असणे हेच यशाचे सीक्रेट असते.
जीवनाच्या परीक्षेत सगळ्याचाच पहिला क्रमांक येत नाही. बोटावर मोजण्याइतके पुढे जातात. त्याला जोड असते त्यांच्या अथक परिश्रमाची. विजेता बनण्यासाठी काही गुण आवश्यक असतात. आपण का ते आचरणात आणले तर कोणतेही क्षेत्र असो, आपल्यावर मागे फिरून पाहण्याची वेळ येत नाही. पाहिजे त्या क्षेत्रात आपण यशाचे झेंडे मिरवू शकतो. कष्टाची पराकाष्टा आणि ध्येयाकडे वाटचाल याची जुगलबंदी केल्याशिवाय यशाचे शिखर गाठता येऊ शकत नाही. यासर्व गोष्टीची योग्य योजना आणि स्थिरता आपल्याला यशाच्या योग्य मार्गावर नक्कीच नेऊन ठेवणार हे मात्र खरे.!
योजना : यशस्वी करियरमध्ये महत्वाची भूमिका असणारे आणखी एक महत्वाचे साधन म्हणजे योजनाबद्ध जीवन. योजना सुव्यवस्थित नसल्यास नकारात्मक परिणामांना आणि घटनांना सामोरे जावे लागते. योजनाबद्ध रीतीने केलेले काम अपयशी ठरतच नाही असे नसून, एखाद्या कारणाने ते अपयशी ठरल्यास, त्यातून होणारे नुकसान फार मोठे नसते.
चांगल्या योजनेमुळे नुकसनातील धोका कमी होण्याबरोबरच वळेची आणि पैश्यांची बचतहि मोठ्या प्रमाणात होते. कोणत्याही परीक्षेची तयारी करताना ती योजनाबद्ध असल्यास, त्यात यशस्वी होण्याची शक्यता फार मोठी असते. साहजिकच पहिल्याच प्रयत्नात यश मिळाल्याने दुसऱ्यांदा तयारी करण्यासाठी वेळ व पैसा व्यर्थ जात नाही.
स्थिरता : तुमच्या व्यक्तीमत्वात स्थिरता असणे आवश्यक आहे. तुमच्या योजनेच्या भाग असलेली कामे सातत्याने पार पाडलीत तरच अपेक्षित परिणाम मिळतील आणि तुम्ही यशाचा मार्ग गाठू शकाल. आखलेल्या योजनेनुसार दैनंदिन जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत, तर घेतलेल्या निर्णय आखलेली योजना आणि बनवलेली शिस्त नकारात्मक परिणाम निश्चितच दाखवेल.
Post Top Ad
Responsive Ads Here
Thursday, November 28, 2019
Subscribe to:
Post Comments (Atom)
ऑनलाइन शिक्षण - Future Investment !
ऑनलाइन शिक्षण - Future Investment ! शब्दांकन - प्राचार्य डॉ. सुजित टेटे जर कोरोना संपलाच नाही तर ? जर शाळा २-३ वर्षे उघडल्याच नाही तर ...
Post Bottom Ad
Responsive Ads Here
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.
No comments:
Post a Comment